उन्हाळ्यात शुज घातल्याने पायांना घाम येतो. त्यामुळे बरेचजण या दिवसात चप्पल किंवा सॅंडन्ल घालण्यास प्राधान्य देतात. चप्पल किंवा सॅंडल्समुळे पायांना घाम येत नसला तरी उन्हामुळे पायांना टॅंनिंग मात्र नक्कीच होते. पायांच्या टॅनिंगमुळे पायांचे सौंदर्य खराब होते. अशा वेळी महिला बाजारात मिळणारे टॅनिंग रिमुव्हल क्रीम विकत घेऊन त्याचा वापर करतात. काहीवेळा यामुळे टॅनिंग कमी होते तर काहीवेळा पाय काळेकुट्ट किंवा पायांवर चप्पलांच्या असलेल्या खूणा तशाच दिसतात. अशावेळी तुम्ही घरगुती उपाय करून पायांचे टॅंनिंग घालवू शकता. यासाठी तुम्हाला पायांना कोलगेट लावावी लागेल. आज आपण जाणून घेऊयात, कोलगेटने पायांचे टॅंनिग कसे दूर करायचे..
सूर्य टॅनिंग समस्या
पायांचे टॅंनिग असे घालवा –
कोलगेटचा टॅन रिमूव्हर पॅक तयार करण्यासाठी तुम्हाला एक चमचा कोलगेट आणि एक चमचा कॉफी मिक्स करावी लागेल. या मिश्रणात चिमूटभर बेकिंग सोडा आणि लिंबाचा रस घाला. तयार मिश्रण टुथब्रशच्या साहाय्याने पायांवर लावावे.
दह्याच्या साहाय्याने पायांचे टॅंनिंग दूर करता येईल. यासाठी वाटीभर दह्यामध्ये 2 चमचे बेसन मिक्स करा आणि तयार मिश्रण पायांना लावा, फरक जाणवेल.
मध आणि लिंबाच्या रसाने पायांचे टॅनिंग दूर करता येईल कारण लिंबाच्या रसात व्हिटॅमिन सी, ब्लीचिंग आणि एंटी-इफ्लेमेटरी गुणधर्मं असतात, जे पायांचा काळेपणा दूर करू शकतात.
टोमॅटोमध्ये लाइकोपीन असते, जे त्वचेला हानी होण्यापासून वाचवते.
कच्चा पपईने स्कीन टॅनिंग घालवता येते. पपईतील गुणधर्मामुळे त्वचा मुलायम होतेच शिवाय चमकदार बनते.
दही आणि हळदीच्या मिश्रणाने टॅंनिग कमी होते. यासाठी दही आणि हळदीचे मिश्रण पायांवर 15 ते 20 मिनिटे लावून ठेवा. काही दिवस सतत हा उपाय केल्यास नक्कीच फरक जाणवेत.