Abir Gulaal: पाहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर 'अबीर गुलाल' चित्रपटावर बंदीची मागणी; सोशल मीडियावर नेटकऱ्यांचा संताप
Saam TV April 24, 2025 04:45 AM

Abir Gulaal BOYCOTT: पाहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. याच पार्श्वभूमीवर, पाकिस्तानी अभिनेता फवाद खान आणि भारतीय अभिनेत्री वाणी कपूर यांचा आगामी चित्रपट ‘अबीर गुलाल’ सोशल मीडियावर वादात सापडला आहे. ट्विटरसह अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर युजर्सने या चित्रपटावर बहिष्कार टाकण्याची मागणी सुरू केली आहे. अनेकांनी "देशप्रेमापेक्षा चित्रपट महत्त्वाचा नाही" असे म्हणत चित्रपट निर्मात्यांवर आणि कलाकारांवर टीका केली आहे.

नेटिझन्सनी ‘अबीर गुलाल’ची तुलना करण जोहरच्या २०१६ मधील ‘ऐ दिल है मुश्किल’ या चित्रपटाशी केली आहे. ‘उरी’ हल्ल्यानंतर देखील च्या भूमिकेमुळे ‘ऐ दिल है मुश्किल’ वादात सापडला होता. त्यावेळीही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर विरोध होऊन चित्रपटगृहांसमोर आंदोलने झाली होती. अनेकांनी आठवण करून दिले की, अशा परिस्थितीत देशातील भावना आणि सुरक्षा याला प्राधान्य द्यायला हवे, ना की व्यापारी हितसंबंध.

पाहलगाम येथील हल्ल्यात जवानांना लक्ष्य केल्याने देशभरात संतापाची लाट आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी कलाकारांना बॉलिवूडमध्ये स्थान दिले जात असल्याचे अनेकांना खटकले आहे. युजर्सने यावेळीही केंद्र सरकार आणि सेन्सॉर बोर्डाकडे अशा चित्रपटांवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. काहींनी असेही नमूद केले की, जर बॉलिवूडला राष्ट्रहित जपायचे असेल, तर पाकिस्तानी कलाकारांना संधी देणे थांबवावे.

सध्या ‘’ चित्रपटाबाबत अधिकृत घोषणा किंवा कोणतीही प्रतिक्रिया निर्मात्यांकडून आलेली नाही. मात्र, सोशल मीडियावरील बहिष्कार मोहिमेला पाहता निर्मात्यांना चित्रपटाच्या प्रचारात अडचणी येण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत या वादावर चित्रपट टीमकडून स्पष्टीकरण येते का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.