पहलगाम हल्ल्यानंतर सर्वत्र पाकिस्तानविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. फक्त भारतातच नाही तर इतर देशांनीही पाकिस्तानविरोधात निषेध व्यक्त केला आहे. केवळ चीन, आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या पाठिंब्यावर टिकून असलेल्या पाकिस्तानची अर्थव्यवस्था वाईट आहे. पण पाकिस्तानात अशा काही गोष्टी आहेत ज्या जगात नंबरवनला आहे. या बाबतीत अमेरिकेसारखा देशही पाकिस्तानच्या मागे आहे. कोणत्या आहेत त्या गोष्टी.
या 10 गोष्टींमध्ये पाकिस्तान जगात पहिल्या क्रमांकावर
जगातील सर्वात मोठं बंदर जगातील सर्वात मोठं बंदर हे पाकिस्तानमध्ये आहेत. या बंदराचं नाव ग्वादर असं असून पाकिस्तानबरोबरच चीन सुद्धा या बंदराचा वापर करतं.
रुग्णवाहिका सेवा पाकिस्तानमध्ये जगातील सर्वात मोठी स्वयंसेवी रुग्णवाहिका सेवा आहे. हे ईधी फाउंडेशन चालवते. पाकिस्तानमध्ये ही रुग्णवाहिका सेवा 24 तास सुरू असते. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही रुग्णवाहिका सेवा पाकिस्तानच्या कानाकोपऱ्यात पोहोचली आहे. यामुळेच ईधी फाउंडेशनची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही नोंद झाली आहे.
सर्वात उंच धरण – तारबेला धरण पाकिस्तानमधील तारबेला धरण हे त्याच्या पाणी साठवण क्षमतेच्या आधारे जगातील सर्वात मोठे मातीचे धरण आहे. हे धरण भारतातील प्राचीन नदी सिंधू नदीवर आहे. एवढेच नाही तर ते पाकिस्तानच्या जलविद्युत क्षमतेचा एक महत्त्वाचा स्रोत आहे.
जगातील सर्वात उंचीवरील एटीएम पाकिस्तानमध्ये जगातील सर्वात उंच ATM देखील आहे. हे पाकिस्तानमधील खुंजेरब खिंडीवर आहे. समुद्रसपाटीपासून त्याची उंची 15,397 फूट आहे. हे ATM नॅशनल बँक ऑफ पाकिस्तान द्वारे चालवले जाते.
सर्वात तरुण नोबेल पारितोषिक विजेते नोबेल पारितोषिक विजेती मलाला युसुफजई ही देखील पाकिस्तानची आहे. वयाच्या 17 व्या वर्षी त्यांना शांततेचा नोबेल पुरस्कार देण्यात आला. अशाप्रकारे, हा पुरस्कार मिळवणारी ती जगातील सर्वात तरुण व्यक्ती ठरली.
हँडबॉल आणि फुटबॉलची निर्मिती पाकिस्तान खेळात कसाही असला तरी, क्रीडा साहित्यात पाकिस्तान संपूर्ण जगात पहिल्या क्रमांकावर आहे. एका आकडेवारीनुसार, जगातील 70% पेक्षा जास्त फुटबॉल, विशेषतः फिफा विश्वचषकात वापरले जाणारे, पाकिस्तानमधील सियालकोटमध्ये बनवले जातात.
पाकिस्तानमधील दुसरे सर्वात उंच शिखर जगातील दुसरे सर्वात उंच शिखर, के-2 पर्वतरांग, देखील पाकिस्तानमध्ये आहे. पाकिस्तानमध्ये जगातील 5 सर्वात उंच शिखरे आहेत, जी जगातील इतर कोणत्याही देशात आढळत नाहीत.
अणुऊर्जा असलेला एकमेव मुस्लिम देश पाकिस्तान हा अणुऊर्जा असलेला एकमेव मुस्लिम देश . तसेच इराण अणुकार्यक्रमावर काम करत आहे, ज्यावर अमेरिकेने निर्बंध लादले आहेत.
काश्मिरी शॉल आणि आंब्यांची निर्यात काश्मिरी शॉल आणि जगप्रसिद्ध चौंसा आणि सिंधरी आंब्यांच्या निर्यातीत पाकिस्तान आघाडीवर आहे
सर्वात पुरातन संस्कृती जगातील सर्वात पुरातन आणि सर्वात मोठ्या मानवी संस्कृतींपैकी एक म्हणजे सिंधू खोऱ्यातील संस्कृतीचा विकास ज्या भागात झाला तो भाग आज पाकिस्तानमध्ये आहे.
सर्वात उंचावरील पोलो मैदान पाकिस्तानमधील शंदूर येथील पोलोचं मैदान हे जगातील सर्वात उंचावरील पोलो मैदान आहे.
जगातील सर्वात उंचावरील पक्का रस्ता चीन-पाकिस्तानदरम्यानचा मैत्री राजमार्ग हा जगातील सर्वात उंचावरील पक्का रस्ता आहे. चीन-पाकिस्तान मैत्री मार्गाला काराकोरम राजमार्ग असंही म्हणतात.