Maharashtra News Live Updates: चाकण-शिक्रापूर रस्त्यावर करंदी येथे भीषण आग, ८ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी
Saam TV April 29, 2025 10:45 PM
चाकण-शिक्रापूर रस्त्यावर करंदी येथे भीषण आग, ८ दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी

चाकण-शिक्रापूर रस्त्यालगत करंदी येथे टायरच्या दुकानाला लागलेल्या आगीत परिसरातील ७ ते ८ दुकानं आणि टपऱ्या भस्मसात झाल्या आहेत. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दल अद्याप दाखल झाले नाही. या आगीत एका गँस सिलिंडरचा स्पोट झाला असून, आग हळू हळू पसरत चालली आहे.

माढ्याचे तहसीलदार विनोद रणवरे निलंबित; आमदार अभिजीत पाटील यांच्या तक्रारीनंतर कारवाई

माढा येथील तहसीलदार विनोद रणवरे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. कामात अनियमितता आणि हलगर्जीपणा केल्याचा ठपका ठेवण्यात आला होता. आमदार अभिजित पाटील यांनी तहसीलदार रणवरे यांच्या विषयी तक्रार केली होती. त्यानंतर सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आर्शिवाद यांनी निलंबनाची कारवाई केली आहे.

दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सोनाळा शहर कडकडीत बंद...

पहलगाव येथील दहशतवादी हल्ल्याची घटना मानवतेला काळीमा फासणारी आहे. ..

हा हल्ला देशाच्या समता बंधुता व एकात्मतेला बाधा पोहोचविणारा आहे...या हल्ल्याचा निषेध करण्यासाठी संग्रामपूर तालुक्यातील सोनाळा शहर कडकडीत बंद पाळण्यात आला आहे

या भ्याड हल्ल्यासाठी जबाबदार असलेल्या दहशतवाद्यांवर कठोर कार्यवाही करण्याची मागणी विश्व हिंदू परिषद व बजरंग दलाच्या वतीने यावेळी करण्यात आली....

Pune News: पुण्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाच आंदोलन

पीएमआरडीए डीपी रद्द केल्याच्या निषेधार्थ. राष्ट्रवादीच आंदोलन

पीएमआरडीए डीपी रद्द का केला याचा भंडाफोड करणार प्रशांत जगताप

जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर शरद पवार गटाच आंदोलन

आरक्षण टाकण्यासाठी पैसे घेतल्याचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा आरोप

कारवाई करण्याची सरकारकडे मागणी

पुणे अहिल्यानगर हायवेवर अपघात

पुणे अहिल्यानगर हायवेवर रांजणगाव गणपती जवळ पिंपरी दुमाला रोडवर तेरा मजुरांना घेऊन जाणारा टेम्पोला दुसऱ्या वाहनाची धडक यामध्ये अनेक कामगार जखमी

रांजणगाव मधिल नजीकच्या हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचारासाठी दाखल केले आहे

नाशिक रायगड पालकमंत्री तिडा आज उद्या पुढच्या पाच वर्षात सुटणार नाही, रोहित पवारांचा दावा

नाशिकच्या पालकमंत्रिपदावरून सुरू झालेला संघर्ष थांबायचं नाव घेत नाही! अशात आमदार रोहित पवारांनी या वादात उडी घेतलीय

हा तिडा आज, उद्या, पुढची पाच वर्षेही हा तिढा सुटणार नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना हा तिढा मान्य नसला, तरी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाशिकचं पालकमंत्रिपद आपल्या ताब्यात ठेवण्याचा निर्धार केल्याचं रोहित पवारांनी ठणकावून सांगितलं आहे.

कल्याण डोंबिवलीत बांगलादेशी नागरिकांवर कारवाई; 6 बांगलादेशी अटकेत

कल्याण - पहलगाम हल्ल्यानंतर विनापरवाना वास्तव्य करणाऱ्या परदेशी नागरिकांवर कारवाईचा बडगा तीव्र करण्यात आला आहे. कल्याण परिमंडळ तीन मधील 6 बांग्लादेशी नागरिकांची धरपकड करण्यात आली आहे. तर मागील चार महिन्याच्या कालावधीत 36 बांग्लादेशी वर कारवाई करत त्यांच्याविरोधात 17 केसेस दाखल करण्यात आल्याची माहिती कल्याण परिमंडळ 3 चे पोलिस उपायुक्त अतुल झेंडे यांनी दिली

Solapur News: सोलापूरचे मारुती चितमपल्ली पद्मश्री पुरस्काराने सन्मानित

देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असलेल्या पद्मश्री पुरस्काराचे वितरण सोमवारी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मु यांच्या हस्ते करण्यात आले. या पुरस्कारामध्ये महाराष्ट्रातील नऊ मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी सोलापुरातील वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांना साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील कामगिरीसाठी पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. राष्ट्रपती भवनातील पार पडलेल्या या शानदार कार्यक्रम आता हा सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमात उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा तसेच केंद्रातील अनेक मंत्री उपस्थित होते.

केडीएमसीने नसलेले डिव्हायडर रंगवले, लाखोंचे बिल काढले मनसेचा आरोप

के डी एम सी ने मुरबाड रोड ते गुरुदेव हॉटेल पर्यंत डिव्हायडर धुणे व रंगवण्याच्या कामाचे बिल ठेकेदाराला दिली आहेत .मनसे कार्यकर्त्यांनी माहितीच्या अधिकारात ही बाब उघडकिस आणली . मात्र प्रत्यक्षात स्टेशन परिसरात गुरुदेव हॉटेलपर्यंत डिव्हायडर नसताना ही बिल महापालिकेने दिलीच कशी असा सवाल आता मनसे कार्यकर्त्यांनी उपस्थित केलाय .केडीएमसीच्या या भ्रष्टाचारा विरोधात मनसे कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांनी आज मिस्टर इंडियाचा चष्मा घालत हातात ब्रश व कलरची बादली घेऊन स्टेशन परिसरात आंदोलन केलं .

वणी-नांदुरी रस्त्यावर भाविकांच्या वाहनाचा अपघात; २०हून अधिक प्रवासी जखमी

- भाविकांनी भरलेला टेम्पो वळणावर अंदाज न आल्यानं उलटला

- टेम्पोत असलेले २० हुन अधिक प्रवासी जखमी

- नवसस्पुर्तीसाठी येणाऱ्या भाविकांचा झाला अपघात

- दरेगाव नजीक मोहनदरी फाट्यावर झाला अपघात

- अपघातात लहान मुलांसह महिला, पुरुष जखमी

- जखमींना वणीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी केले दाखल

- गंभीर जखमींना नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात दाखल केले जाणार

अक्षय तृतीयेसाठी आंब्याची मागणी वाढली...

नाशिकच्या मालेगाव मधील फळबाजारात आंब्यांची आवक झपाट्याने वाढली असून ग्राहकांचा चांगला प्रतिसाद असल्यामुळे बाजारपेठ गजबजून गेली आहे. रत्नागिरी देवगड हापूस केशर लालबाग, आणि गुलाबखस या प्रकारच्या आंब्यांना ग्राहकांचा विशेष प्रतिसाद मिळत आहे. अक्षय तृतीयेच्या सणा च्या तोंडावर आंब्याच्या खरेदीसाठी गर्दी सुरू झाली आहे, सध्या रत्नागिरी हापूस डझनला सुमारे १२०० रुपये. तर देवगड हापुस प्रति किलो २५० रुपयांचा आसपास आहेत. केसर आणि लालबाग हे आंबे १५० ते २०० रुपयांच्या दरम्यान विकले जात आहेत.

Nashik News: गंगापूर धरणातून १ हजार क्युसेकने पाण्याचा विसर्ग

- गंगापूर धरणातून गोदावरी नदी पात्रात पाण्याचा विसर्ग

- एकलहरे औष्णिक विद्युत केंद्र आणि गोदावरी कालव्यांच्या आवर्तनासाठी गंगापूर धरणातून सोडलं पाणी

- गंगापूर धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे ऐन उन्हाळ्यात गोदामाई खळाळली

- नाशिकमध्ये रामकुंड, गोदाघाटाच्या परिसरात पाणी पातळीत वाढ

- गोदा घाटावरील लहान मंदिरांना गोदावरीच्या पाण्याचा वेढा

- पाण्यासोबत जलपर्णी देखील वाहून आल्याने परिसरात दुर्गंधीचे साम्राज्य

- गोदावरीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर

Baramati: हर्षवर्धन पाटलांच्या पत्नीच्या खांद्यावर आता नीरा भिमा कारखान्याची धुरा.....

नीरा भिमा कारखान्याच्या अध्यक्षपदी भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची निवड..... हर्षवर्धन पाटील हे राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष

इंदापूर तालुक्यातील नीरा भिमा सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे अध्यक्ष हर्षवर्धन पाटील यांच्या पत्नी भाग्यश्री हर्षवर्धन पाटील यांची निवड करण्यात आली आहे तर उपाध्यक्षपदी दादासाहेब घोगरे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Solapur News: सोलापूर विमानतळावरून विमान सेवा 26 मे पासून सुरू होणार

- 16 मे पासून विमानसेवेची बुकिंग होणार सुरू..

- आठवड्यातून दोन दिवस सोलापूर गोवा विमानसेवा असणार, सोमवार आणि शुक्रवार गोव्यासाठी असणार उडान..

- 16 मे पासून ऑनलाईन आणि विमानतळावरून तिकीट बुकिंगची सुविधा..

- गोव्यातून सोलापूर साठी सकाळी 7.20 मिनिटांनी विमान उडेल तर सोलापुरातून गोव्यासाठी 8:50 मिनिटाने विमान उडणार..

- सोलापूर विमानतळ विमान सेवेसाठी पूर्णपणे सज्ज

- जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची माहिती..

Solapur: सोलापुरात आणखी एका डॉक्टराची आत्महत्या

- गळा कापून घेत आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात एकच खळबळ

- आदित्य नमबियार असे आत्महत्या केलेल्या शिकाऊ डॉक्टरचे नाव आहे

- डॉ. शिरीष वळसंगकर यांचे आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच दुसऱ्या एका डॉक्टरची आत्महत्या

- डॉ. आदित्य नमबियार याचे नुकतेच एम.बी.बी.एस.चे शिक्षण पूर्ण झाल्याची प्राथमिक माहिती

- भाड्याने राहत असलेल्या रूममध्ये गळा कापून घेत केली आत्महत्या

- मात्र आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून पुढील तपास सुरूय

लातूरमध्ये घागर भर पाण्यासाठी जीव मुठीत.. अग्रवाल तांड्यावर पाण्याची भीषणता...

लातूर जिल्ह्यातल्या वाडी तांड्यांना भीषण पाणीटंचाईची जाणवत आहे... लातूरच्या जळकोट तालुक्यातील अग्रवाल तांड्यावर घागर भर पाण्यासाठी नागरिकांना जीवघेणी कसरत करून पाणी काढावे लागत आहे.. खोल विहिरीत उतरून तळाला गेलेले पाणी जीव धोक्यात घालून तरुणांना काढावे लागत आहे.. जळकोट तालुक्यातील गुत्ती ग्रामपंचायत अंतर्गत असलेला अग्रवाल तांडा हे मागच्या अनेक वर्षापासून पाण्यासाठी वन वन फिरत आहे.

डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी मनीषा माने यांचा जामीनासाठी न्यायालयात अर्ज

- न्यूरोलॉजिस्ट डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्या प्रकरणातील संशयित महिला आरोपी मनीषा माने यांचा जामिनासाठी न्यायालयात अर्ज

- संशयित महिला आरोपीचे वकील प्रशांत नवगिरे यांच्यामार्फत जामीनासाठी सादर करण्यात आला अर्ज

- मनीषा माने सध्या 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या जामीन अर्जावर आज होणार सुनावणी

- त्यामुळे बहुचर्चित असलेल्या या प्रकरणातील महिला आरोपी मनीषा माने यांना जामीन मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष

Sangli News: सांगलीत बेकायदेशीरपणे गाईच्या वासरांची तस्करी...

मिरज पंढरपूर रस्त्यावर बेकायदेशीर पणे गाईच्या वासरांची तस्करी करणारा टेम्पो श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान गो रक्षा समितीच्या कार्यकर्त्यांनी पकडला आहे.. गाडीचा पाठलाग करत असताना गाडी पलटी झाली. यावेळी तस्करी साठी 33 वासरे चारचाकी गाडीत आढळली आहेत. यातील पाच वासरे मृत्युमुखी पडली आहेत. तर अन्य वासरांची सुटका करण्यात आली.या गाडीचा चालक पळून गेला आहे.

वेण्णा लेक येथील 28 स्टॉल धारकांचा जलसमाधीचा इशारा... महा पर्यटन महोत्सवा दिवशी करणार आंदोलन

महाबळेश्वर मधील वेण्णा लेक परिसरातील २८ स्टॉल धारकांनी २ मे ला म्हणजेच महा पर्यटन उत्सवा दिवशी जल समाधीचा प्रशासनाला इशारा दिला आहे.हे स्टॉल धारक अनेक वर्षांपासून वेण्णा लेक परिसरात उपजीविकेसाठी वेगवेगळे व्यवसाय करत होते.मात्र २०२३ मध्ये हे स्टॉल वन विभागाद्वारे काढून टाकण्यात आले.यामुळे गेल्या २ वर्षापासून या २८ कुटुंबांवर उपासमारीची वेळ आलेली आहे.

शरद पवार गटाला मोठा धक्का! माजी मंत्री डॉ सतीश पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार

जळगावच्या पारोळा येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी मंत्री डॉ सतीश पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार

लवकरच मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत डॉ. सतीश पाटील कार्यकर्त्यांसह अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याची माहिती

पारोळा -एरंडोल मतदारसंघातून डॉ.सतीश पाटील यांनी शरद पवार गटाच्या तुतारी चिन्हावर विधानसभा निवडणूक लढवली यात ते पराभूत झाले आहेत

राष्ट्रवादी अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी डॉ. सतीश पाटील यांच्या अजित पवार गटातील प्रवेशाला दुजोरा दिला आहे.

डॉ. सतीश पाटील यांची आज त्यांच्या तालुक्यातील कार्यकर्त्यांसोबत बैठक असून यात प्रवेशाची तारीख निश्चित केली जाणार असल्याची माहिती आहे..

Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला आंबा स्वस्त! पुण्यात खरेदीसाठी गर्दी

साडे तीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेसाठी कोकणातून पुणे, मुंबईसह राज्यातील प्रमुख बाजारपेठांत हापूसची मोठी आवक सुरू झालीय. आवक वाढल्याने दरांत घट झाली असून, तयार हापूस बाजारात मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे. प्रतवारीनुसार हापूसचा दर ५०० ते ८०० रुपयांपर्यंत आहे. हंगामातील दुसऱ्या टप्यात आंब्याची आवक वाढली असून बाजारात तयार आणि कच्चा आंबा मोठ्या प्रमाणावर उपलब्ध झाला आहे.

पुणे विमानतळाजवळ बिबट्याचा वावर, बिबट्या थेट रन वे वर

काल रात्री अंदाजे ९.३० वाजता पुण्यातील लोहेगाव परिसरात, पुणे विमानतळाजवळ बिबट्या फिरताना नागरिकांनी पाहिला. या घटनेचा व्हिडीओ आणि फोटो काही लोकांनी सोशल मिडियावर शेअर केला आहे. घटनेची माहिती मिळताच वनविभाग आणि स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. विमानतळ परिसरात गरज नसल्यास फिरू नये, असे आवाहन करण्यात आलं होतं. काही जणांनी दिलेल्या माहितीनुसार, बिबट्याचा पुणे विमानतळाच्या धाव पट्टीवर सुद्धा वावर होता.

देशातील पहिलं आधारकार्ड धारक आदिवासी महिलेला तब्बल नऊ महिन्यांनी मिळाला भारतीय बहीण योजनेचा लाभ

देशातील पहिला आधार कार्ड देऊन गौरवण्यात आलेल्या आदिवासी महिलेला लाडकी बहीण योजनेसाठी मोठा संघर्ष करावा लागलेला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील टेंभली गावात राहणाऱ्या आदिवासी महिलेला तत्कालीन पंतप्रधान मनमोहन सिंग यांचा हस्ते पहिलं आधार कार्ड देऊन आधार कार्ड योजनेचा शुभारंभ करण्यात आला होता मात्र त्याच महिलेला लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी शासकीय कार्यालयात फिरफिर करावी लागली आहे

पोलीस उपनिरीक्षक रंजीत कासलेला छत्रपती संभाजीनगरच्या हरसुल जिल्हा कारागृहात हलवले.

संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाल्मीक कराड सध्या बीडच्या जिल्हा कारागृहामध्ये असून त्याच्या संदर्भात वादग्रस्त वक्तव्य केलेले बडतर्फ पोलीस उपनिरीक्षक न्यायालयाने कोठडी मध्ये असलेले रणजीत कासले याला सुरक्षेच्या कारणावरून बीड जिल्हा कारागृहामध्ये छत्रपती संभाजी नगरच्या हरसुल कारागृहामध्ये हलवण्यात आले आहे

लातूर मनपाच्या इतिहासात यंदा सर्वाधिक करवसूली मनपाच्या तिजोरीत 80 कोटीचा भरणा

लातूर महानगरपालिकेने यंदा सर्वाधिक कर वसुली केली आहे.. मनपाच्या तिजोरीत यंदा तब्बल 80 कोटीची जोरदार वसुली केली आहे..गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कमालीची कर वसुली झाल्याने महापालिकेच्या वतीने शहरवासीयांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी सुविधांमध्ये देखील वाढ होणार आहे.

नाशिकच्या मालेगाव मध्ये तापमानाचा पारा आज पुन्हा 43 अंशाच्या पुढे गेला आहे

रोज तापमान कमी जास्त होत असले तरी ते सातत्याने 42 अंशाच्या पुढे जात असताना आज तापमान पुन्हा 43.2 अंशावर गेले,सकाळ पासूनच तापमानाचा पारा हळू हळू वाढू लागत असल्याने कामासाठी बाहेर पडणाऱ्या उन्हाच्या झळांचा सामना करावा लागत आहे

जालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा जप्त, तीन संशयित आरोपी जेरबंद

जालन्यात 29 लाखांचा 85 किलो गांजा स्थानिक गुन्हे शाखा आणि दहशतवाद विरोधी शाखेच्या पोलिसांनी जप्त केलाय. एका चार चाकी वाहनातून 85 किलो गांजा विक्रीसाठी नेला जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे जालना ते छत्रपती संभाजीनगर रोडवर कारवाई करत पोलिसांनी तीन आरोपींना जेरबंद केल आहे.

Nashik News: नाशिकच्या नांदगाव तालुक्यात ८ गावं, वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा

नाशिकच्या नांदगाव तालुक्यात ८ गावं, वाड्यावस्त्यांना टँकरने पाणीपुरवठा

नाशिकच्या नांदगाव तालूक्यात पाणी टंचाई झळा बसू लागल्या

तालूक्यातील आठ गावे व वाड्यावस्त्यांना पाणी पुरवठा करण्यासाठी टँकर सुरु करण्यात आले आहे.

मागील वर्षी जिल्ह्यात सर्वाधिक ७७ टँकर सुरु होते नव्याने पुन्हा अकरा गावे व वाड्यावस्त्यांसाठीचे प्रस्ताव पाठविण्यात आले आहे.

मागील वर्षी चांगला पासून झाल्याने यंदा एप्रिल च्या दुस-या आठवड्या पासून पाण्याचे टँकर सुरु करण्यात आले आहे.

Amravati News: अमरावतीत रात्री 8 ते 2 वाजेपर्यंत सर्वाधिक वीजपुरवठा खंडित

अमरावती -

अमरावतीत रात्री 8 ते 2 वाजेपर्यंत सर्वाधिक वीजपुरवठा खंडित

दरदिवशी 300 तक्रारी

विजेच्या वाढत्या मागणीमुळे महावितरणच्या यंत्रणेवर वाढला ताण

कमी अधिक दाबाने कुलर किंवा एसी उपकरणे चालवणे झाले अवघड

तापमानात वाढ झाल्याने कुलर आणि एसी सर्वाधिक लावले जात आहे त्यामुळे विजेच्या दाबावर त्याचा परिणाम होत आहे

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.