आयपीएलच्या 18 व्या मोसमातील 49 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स आमनेसामने असणार आहेत. श्रेयस अय्यर पंजाबचं तर महेंद्रसिंह धोनी चेन्नईचं नेतृत्व करणार आहे. दोन्ही संघांचा हा या मोसमातील 10 वा सामना असणार आहे. दोन्ही संघांची ही या मोसमात आमनेसामने येण्याची ही दुसरी वेळ असणार आहे. याआधी दोन्ही संघ 8 एप्रिलला आमनेसामने आले होते. तेव्हा पंजाब किंग्सने चेन्नई टीमवर 18 धावांनी विजय मिळवला होता. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्सकडे या सामन्यात विजय मिळवून गेल्या पराभवाची परतफेड करण्याची संधी असणार आहे. त्यामुळे चेन्नई पंजाबचा हिशोब बरोबर करणार का? याकडे यलो आर्मीचं लक्ष असणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना बुधवारी 31 एप्रिलला खेळवण्यात येणार आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना एमए चिदंबरम स्टेडियम,येथे आयोजित करण्यात आला आहे.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामन्याला संध्याकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 7 वाजता टॉस होईल.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.
चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स लाईव्ह मॅच मोबाईलवर जिओहॉटस्टार एपवर लाईव्ह पाहायला मिळेल.
पंजाब किंग्सने या मोसमात आतापर्यंत 9 सामने खेळले आहेत. पंजाबने या 9 पैकी 5 सामने जिंकले आहेत. तर 3 सामने गमावले आहेत. तर एका सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. त्यामुळे पंजाब 11 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये पाचव्या स्थानी आहे. तर दुसऱ्या बाजूला चेन्नई सुपर किंग्सला या हंगामात लौकीकाला साजेशी कामगिरी करता आलेली नाही. त्यामुळे चेन्नईचं या मोसमातून पॅकअप झालं आहे. चेन्नईला 9 पैकी फक्त 2 सामनेच जिंकता आले आहेत. तर चेन्नईला 7 वेळा पराभूत व्हावं लागलं आहे. चेन्नई 4 गुणांसह पॉइंट्स टेबलमध्ये सर्वात शेवटी दहाव्या स्थानी आहे.
चेन्नईचं प्लेऑफमधून पॅकअप झालं आहे. त्यामुळे चेन्नईचा आता जाता जाता काही सामने जिंकण्याचा प्रयत्न असणार आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाबसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना महत्त्वाचा असणार आहे. त्यामुळे चेन्नई हा सामना जिंकून पंजाबच्या अडचणी वाढवू शकते. त्यामुळे पंजाबच्या दृष्टीने हा निर्णायक ठरणार आहे.