ठाणे शहर (बातमीदार)ः जम्मू-काश्मीरच्या पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील मृतांना रक्तदान शिबिरातून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. शिव परिवार आणि शिवशांती प्रतिष्ठानचे संस्थापक अधिवक्ता विनय कुमार सिंह यांच्या पुढाकाराने हा उपक्रम करण्यात आला. पहलगाममध्ये शहीद झालेल्या पर्यटकांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या वेळी रक्तदान ही मानवतेची सर्वात मोठी सेवा असल्याचे मत ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्यचिकित्स्क डॉ. कैलास पवार यांनी व्यक्त केले. या वेळी शिवपरिवार प्रमुख पंडित राम शुक्ला, डॉ. अजय सिंग, अरुणलाल यादव, लक्ष्मी मौर्य, प्राचार्या मनीषा सिंग, मुख्याध्यापक कुंवर तोमर, प्रसिद्ध भोजपुरी गायक सोनू सुरिला, अधिवक्ता शिक्षा संस्कार सिंग उपस्थित होते.