Ipl 2025 : पलटणचा विषय हार्ड, सलग चौथ्या विजयासह तिसर्‍या स्थानी झेप, हैदराबादसह 3 संघ गॅसवर
GH News April 24, 2025 06:05 AM

‘हिटमॅन’ रोहित शर्मा याच्या वादळी खेळीच्या जोरावर मुंबई इंडियन्सने आयपीएल 2025 मधील 41 व्या सामन्यात सनरायजर्स हैदराबादवर 7 विकेट्सने विजय मिळवला. ट्रेंट बोलट याच्या धारदार बॉलिंगच्या जोरावर मुंबईने आधी हैदराबादला त्यांच्याच होम ग्राउंडवर 143 धावांवर रोखलं. त्यानंतर मुंबईने 15.4 ओव्हरमध्ये 144 धावांचं आव्हान पूर्ण केलं. मुंबईकडून रोहित शर्मा याने 46 बॉलमध्ये 8 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीने 70 रन्स केल्या तर. मुंबईने यासह सलग चौथा तर एकूण पाचवा विजय मिळवला. मुंबईने 26 बॉलआधी विजय मिळवल्याने त्याचा फायदा नेट रनरेटमध्ये झाला.

मुंबईने तिघांना पछाडलं

मुंबई इंडियन्सने हैदराबाद विरूद्धच्या मोठ्या आणि एकतर्फी विजयासह पॉइंट्स टेबलमध्ये मोठी झेप घेतली. मुंबई ताज्या आकडेवारीनुसार, पॉइंट्स टेबलमध्ये तिसऱ्या स्थानी पोहचली आहे. मुंबई या सामन्याआधी सहाव्या स्थानी होती. मुंबईच्या खात्यात आता 9 सामन्यानंतर 5 विजयासह 10 पॉइंट्स आहेत. मुंबईचा नेट रनरेट हा +0.673 असा आहे. मुंबईने या विजयासह लखनौ सुपर जायंट्स, पंजाब किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला मागे टाकलं. या तिन्ही संघांनीही प्रत्येकी 5-5 सामने जिंकले आहेत. मात्र मुंबईने नेट रनरेटच्या जोरावर या तिघांना पछाडलं.

हे 3 संघ गॅसवर

हैदराबादचा हा या मोसमातील सहावा पराभव ठरला. हैदराबाद यासह या स्पर्धेतून बाहेर होण्याचा उंबरठ्यावर आहे. हैदराबाद या पराभवानंतर नवव्या स्थानी आहे. हैदराबादचा नेट रनरेट हा -1.361 असा आहे. सनरायजर्स हैदराबाद, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स हे तिन्ही संघांनी प्रत्येकी 8 सामने खेळले आहेत. त्यापैकी फक्त 2 सामने जिंकले आहेत. या तिन्ही संघांनी प्रत्येकी उर्वरित 6 सामने जिंकले तरी त्यांचे 16 गुण होतील. मात्र एकही सामना गमावला तर स्पर्धेतून बाद झालेच समजा. त्यामुळे आता राजस्थान, चेन्नई आणि हैदराबाद या तिन्ही संघांचा कट टु कट हिशोब आहे.

पलटणची तिसऱ्या स्थानी झेप

राजस्थान, हैदराबाद आणि चेन्नई या तिन्ही संघांनी प्रत्येकी 2-2 सामने गमावले तरी त्यांचे 12 पॉइंट्स होतील. त्यामुळे प्लेऑफमध्ये पोहचण्यासाठी 12 पॉइंट्स पुरेसे नाहीत. इथून एक सामना गमावणं प्लेऑफमधून बाहेर होण्यासारखंच असणार आहे. विशेष म्हणजे हैदराबाद विरुद्ध चेन्नई यांच्यात एक सामना होणार आहे. तर चेन्नईला राजस्थान विरुद्ध एक सामना खेळायचा आहे. त्यामुळे या तिघांपैकी 2 संघ स्पर्धेतून बाहेर होणार, इतकं मात्र निश्चित आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.