4.3 रिश्टर स्केल तीव्रता
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यात मंगळवारी रात्री भूकंपाचे धक्के जाणवले. भूकंपमापन यंत्रावर याची तीव्रता 4.3 रिश्टर स्केल इतकी मोजण्यात आली. नॅशनल सेंटर फॉर सिस्मोलॉजी (एनसीएस) नुसार, हा भूकंप रात्री 11:26 वाजता झाला. त्याचे केंद्र जमिनीपासून 20 किलोमीटर खाली होते. भूकंपाचे धक्के सौम्य असले तरी रात्री उशिरा जाणवलेल्या हादऱ्यांमुळे लोकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या भूकंपामुळे सध्या कोणत्याही प्रकारची जीवित किंवा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे. कच्छ परिसर भूकंपाच्या दृष्टीने संवेदनशील मानला जातो. येथे यापूर्वीही मोठे भूकंप झाले आहेत.