Mumbai local Churchgate slow local delay : गुरुवारी सकाळी पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्यामुळे मुंबईकरांची चांगलीच तारांबळ उडाली. ऐन गर्दीच्या वेळी लोकल गाड्या तब्बल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागत आहे. विशेषतः चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या स्लो लोकल गाड्या १५ मिनिटे उशिराने धावत आहेत. मुंबई लोकल उशीराने धावत असल्यामुळे ऑफिसला जाणाऱ्या प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
सकाळच्या गर्दीची वेळ, ऑफिसला जायची लगबग, त्यात लोकल उशीरा धावत आहेत. त्याचा त्रास सर्वसामान्य होत आहे. मुंबई लोकल ही प्रवाशांसाठी जीवनवाहिनी मानली जाते. पण गर्दीच्या वेळीच खोळंबा उडाल्याने नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी सकाळीच लोकल विस्कळीत झाली. त्यामुळे अनेकांना कामावर पोहोचण्यासाठी प्रचंड उशीर झाला.
काही प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारावर नाराजी व्यक्त केली, तर काहींना नाईलाजाने रिक्षा किंवा बसचा पर्याय निवडावा लागला. पश्चिम रेल्वेने तांत्रिक बिघाडामुळे लोकल उशीराने धावत असल्याचे समोर आले आहे. लवकरात लवकर परिस्थिती पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आले.