२४ एप्रिल २०२५ साठी गुरुवार : चैत्र कृष्ण ११, चंद्रनक्षत्र शततारका, चंद्रराशी कुंभ/मीन, सूर्योदय ६, सूर्यास्त ६.५०, चंद्रोदय पहाटे ३.५८, चंद्रास्त दुपारी ३.१९, वरुथिनी एकादशी, श्री वल्लभाचार्य जयंती, भारतीय सौर वैशाख ४ शके १९४७.
दिनविशेष -२०१३ : पंचायतराज व्यवस्थेतील सर्वोत्कृष्ट कामगिरीबद्दल २०१२-१३चा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांच्या हस्ते महाराष्ट्राचे ग्रामविकासमंत्री जयंत पाटील आणि राज्यमंत्री सतेज पाटील यांनी स्वीकारला.
२०१६ : आशियाई विजेत्या संदीप तोमरने पहिल्या ऑलिंपिक पात्रता कुस्ती स्पर्धेत ब्राँझपदक, तसेच भारताला ऑलिंपिक कोटा मिळवून दिला.संदीपने हा पराक्रम फ्री-स्टाइल प्रकारातील ५७ किलो वजनीगटात केला.