Pahalgam Terror Attack : शरद पवारांनी घेतली दिवंगत संतोष जगदाळेंच्या कुटुंबीयांची भेट
Sarkarnama April 24, 2025 05:45 PM
डोंबिवली, मालेगावमध्ये आज बंद

कश्मीरमध्ये झालेल्या पर्यटकांच्या हत्येच्या निषेधार्थ आज (गुरुवार) डोंबिवली, मालेगावमध्ये बंद पाळण्यात येत आहे.

शरद पवारांनी घेतली जगदाळे कुटुंबीयांची भेट

पहलगामहल्ल्यात मृत्यू झालेले पुण्याती संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी भेट घेतली. शरद पवार यांच्याकडून संतोष जगदाळे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.

एकनाथ शिंदेंनी कश्मीरमध्ये पर्यटकांना दिला धीर

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री कश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. शिंदे यांनी कश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांची भेट घेतली तसेच त्यांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. सरकार पर्यटकांच्या मागे ठामपणे उभे असल्याचेही ते म्हणाले.

Pahalgam attack All Party meeting : पहलगाम हल्ला, आज सर्वपक्षीय बैठक

केंद्र सरकारने कश्मीर खोऱ्यात झालेल्या पहलगाम आंतकवादी हल्ल्यावर आज (गुरुवार) सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. हल्ल्याविषयी रणनीती तसेच सुरक्षा उपाय योजनांबाबत यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तर,

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.