अचूक मॅपिंगसाठी डीजीपीएस सर्वेक्षण प्रशिक्षण
esakal April 25, 2025 06:45 AM

पुणे, ता. २४ : डीजीपीएस म्हणजेच डिफरेंशियल ग्लोबल पोझिशनिंग सिस्टम ही ग्लोबल नेव्हिगेशन सॅटेलाइट सिस्टमची सुधारित पद्धत आहे, जी स्थानिक बेस स्टेशनचा वापर करून मोजमापांमधील अचूकता वाढवते. यामुळे स्थानिक त्रुटी दूर होतात आणि अचूकता एक मीटर किंवा त्यापेक्षा कमी येते. यासंदर्भात मार्गदर्शन करणारे पाच रविवार चालणारे एक व्यावहारिक प्रशिक्षण २७ एप्रिलपासून आयोजिले आहे. यात जमिनीचे आणि लोकेशनचे अचूक मॅपिंग करण्यासाठी प्रगत जीपीएस तंत्रज्ञान कसे वापरायचे? हे शिकवले जाणार आहे. विद्यार्थी, अभियंते, नियोजक, सर्वेक्षण किंवा ‘जीआयएस’मध्ये रस असलेल्या प्रत्येकासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे. सहभागींना रस्ते नियोजन, जमिनीच्या नोंदी, बांधकाम आणि इतर महत्त्वाच्या प्रकल्पांमध्ये डीजीपीएस कशी मदत करते, हे शिकायला मिळेल. प्रशिक्षणात क्लासरूम ट्रेनिंग आणि प्रत्यक्ष फील्डवरील ट्रेनिंग या दोन्हींचा समावेश आहे. अचूक नकाशे आणि डेटाची वाढती मागणी लक्षात घेता, हे प्रशिक्षण पायाभूत सुविधा, विकास आणि मॅपिंग क्षेत्रातील करिअरसाठी उपयुक्त कौशल्ये प्रदान करणारे आहे.
संपर्क : ८४८४८११५४४

जुन्या इमारतींचा पुनर्विकास
यूडीसीपीआर नियमामुळे महाराष्ट्रात मोठ्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात जुन्या इमारतींचा पुनर्विकास (रीडेव्हलपमेंट) सुरु आहे किंवा होणार आहे. हा नियम काय आहे? त्यामुळे एफएसआय कसा व किती वाढला? त्याचा वापर कसा करायचा? फिसिबिलीटी रिपोर्ट कशासाठी काढतात? पीएमसी म्हणजे काय? आदींबाबत मार्गदर्शन करणारी ऑनलाइन कार्यशाळा १ मे रोजी आयोजिली आहे. यामध्ये इमारतींचा पुनर्विकास करण्याची पद्धत, त्यासाठीचे पेपर्स, विकसक कसा निवडावा, जुन्या सभासदांना होणारे फायदे, करारनामा कसा करावा, महारेरा रजिस्ट्रेशन आदी सर्व मुद्यांचे सखोल मार्गदर्शन होणार आहे. सोसायटी स्वयंपुनर्विकास करू इच्छिणारे, नवीन विकसक, ज्यांना रीडेव्हलपमेंट क्षेत्रात रस आहे असे सर्वजण, रिअल इस्टेट एजंटसाठी कार्यशाळा उपयुक्त आहे.
संपर्क : ९३५६९७३४२७

मेडिकल कोडिंग प्रमाणपत्र
वैद्यकीय क्षेत्रात करिअरसाठी मेडिकल कोडिंग हे तीन महिन्यांचे प्रमाणपत्र प्रशिक्षण ‘एसआयआयएलसी’ व ‘टेक महिंद्रा’च्या वतीने १५ मेपासून सुरू होत आहे. यामध्ये सीपीसी (सर्टिफाइड प्रोफेशनल कोडर) प्रमाणपत्र तयारीचे मार्गदर्शन तसेच केपीओ (नॉलेज प्रोसेस आउटसोर्सिंग) व बीपीओ (बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग) साठीचे मार्गदर्शन होणार आहे. मेडिकल शब्दावलीची ओळख, मेडीकल सेवा भाषेची समज, शरीर विज्ञान आणि शारीरिक रचना, कोडिंग प्रणाली : आयसीडी-१०, सीपीटी आणि एचसीपीसीएस कोडिंग, वैद्यकीय सेवा नियमावली (एचआयपीएए), कोडिंग नियम व मार्गदर्शक तत्त्वे, कोडिंग सराव इ. चा समावेश आहे. सायन्स विषयातील २१ ते २५ वयोगटांतील पदवीधारक, व्यावसायिक, मेडिकल कोडिंगमध्ये करिअर करू इच्छिणारे प्रवेशास पात्र आहेत.
संपर्क : ८४८४८११५४४

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.