भारताने सिंधू जलवाटप करार करार स्थगित केल्यानंतर पाकिस्तानने भारतासोबतचा व्यापार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. भारतातून उड्डाण करणाऱ्या विमानांना हवाई क्षेत्र बंदी तसेच, पाकिस्तनाच्या बाजूने वाघा बॉर्डर बंद ठेवण्याचाही निर्णय पाकिस्तानने घेतला आहे.
Kolhapur : कोल्हापुरात तरुणाला विवस्त्र करून जबर मारहाणकोल्हापूर जिल्ह्यातील मुरगुड परिसरात एका तरुणाला विवस्त्र करून रॉड, काठ्या आणि लाथाबुक्यांनी जबर मारहाण करण्यात आली आहे. मारेकऱ्यांनी मारहाण करतानाचा व्हिडिओही काढला आहे. बीडमधील घटना ताजी असतानाच कोल्हापुरातही एका तरुणाला विवस्त्र करून मारहाण करतानाच व्हिडिओ काढण्यात आलेला आहे.
Rahul Gandhi : पहलगाममधील घटनेचा घेणार आढावालोकसभेतील विरोधील पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी हे जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. दहशतवादी हल्ल्यात २८ पर्यटकांचा मृत्यू झाला असून २२ जण जखमी झाले आहेत. तेथील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी राहुल गांधी जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार असल्याची माहिती आहे.
Santosh Bangar आम्हीही काही कमी नाही, त्यांना जशास तसे उत्तर देऊ : संतोष बांगरभारतात राहून आपल्या लोकांवर अन्याय, अत्याचार करतात, आतंकवादी घडवतात, अशा लोकांना बाहेर काढून गोळ्या घातल्या पाहिजेत. माझी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना मी हात जोडून विनंती करतो की, आम्हालाही फक्त एक तास द्या. आम्हीही काश्मीरला येतो, आम्हीही काही कमी नाही, त्यांना जशास तसे उत्तर देऊ, असे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी म्हटले आहे.
Pahalgam Terror Attack : नाशिकमध्ये शिवसेनेचा संताप; अमित शाह यांच्या राजीनामाचीही मागणी!शिवसेना उद्धव ठाकरे पक्षातर्फे शहरात आज (ता.22) तीव्र निदर्शने करण्यात आली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा देत पाकिस्तानचा निषेध केला. या हल्ल्यातील दहशतवाद्यांना धडा शिकवण्याची मागणी करण्यात आली. तसेच देशाचे गृमंत्री अमित शाह यांच्या राजीनामाचीही मागणी शिवसेनेनं केलीय.
Crime News : धुळ्यातील रिपाइं उपाध्यक्षाचा कारनामा; औद्योगिक कंपनीकडे दोन कोटीच्या खंडणीची मागणी, गुन्हा दाखलधुळे येथील इन्डो अमाईन्स लिमिटेड कंपनीतील उत्पादनाबाबत खोटी तक्रार देण्याची धमकी देत दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी एक लाख रुपये स्वीकारल्याच्या आरोपावरून रिपाइंचा (ए) उपाध्यक्ष वाल्मिक दामोदर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Pahalgam Terror Attack News : पहलगाम हल्ल्यानंतर ट्रम्प सरकारने अमेरिकी नागरिकांसाठी जारी केल्या मार्गदर्शक सूचनापहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर ट्रम्प सरकारने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. अमेरिकन नागरिकांना जम्मू आणि काश्मीरमध्ये प्रवास न करण्याचा सूचना सरकण्यात आल्या आहेत. काश्मीरमधील पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी गोळीबार केला असून ज्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला होता. 2019 मध्ये झालेल्या पुलवामा हल्ल्यानंतर येथील हा सर्वात घातक हल्ला झाल्याचे म्हटलं जात आहे.
Asaduddin owaisi News : सरकारचे सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन, पण ओवैसींना निमंत्रण नाहीजम्मू काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अतिशय कठोर पावलं उचलली आहेत. यादरम्यान केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन केलं आहे. पण पाच ते दहा खासदार असलेल्या पक्षांनाच आमंत्रण दिल्याचे आता समोर आल्याने एआयएमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी नाराजी व्यक्त करताना संताप व्यक्त केला आहे
जम्मू काश्मीरमध्ये करण्यात आलेल्या भ्याड हल्ल्यानंतर भारत सरकारनं पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठी अतिशय कठोर पावलं उचलली आहेत. पाकिस्तानशी सर्व स्तरावर संबंध तोडण्यात आले असून त्यांचे पाणीही बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे पाकिस्तानने आपल्या युद्ध नौका समुद्रात उतरवल्या आहेत. दरम्यान भारतानेही सर्व युद्धनौकांना अलर्ट मोडवर ठेवले असून नौसैनिक, अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द केल्या आहेत.
Pahalgam Terror Attack News : अॅक्शनच्या आधीच पाकिस्तानची रिअॅक्शनपेहेलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानविरोधात भारतने कठोर पावले उचलली आहेत. भारताने सिंधू जल करार स्थगित करत अनेक निर्णय घेतले आहेत. यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली असून अद्याप पहिल्या स्ट्राइकच्या भीती मनातून गेलेली नाही. यामुळे पाकिस्तानने आपल्या नेवीला अलर्ट केलं असून दोन दिवसांची फायरिंग वॉर्निंग जारी केली आहे.
Sanjay Raut live: काश्मीर प्रश्नावर विशेष अधिवेशन घ्या: संजय राऊतकाश्मीर प्रश्नावर विशेष अधिवेशन घ्यावं, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. संकट काळात आम्ही केंद्र सरकारच्या पाठिशी आहोत, असे संजय राऊत यांनी सांगितले. सरकार घेईल त्या निर्णयाला आमचा पाठिंबा असेल, असे राऊत म्हणाले.
Pahalgam Terror Attack LIVE Updates: सर्व गुप्तचर शाखा बैसरन हल्ल्याचा उलगडा करणारपहलगाम हल्ल्यानंतर काश्मीर खोऱ्यात मोठ्या प्रमाणात कारवाई सुरु आहे. देशातील या महत्त्वाच्या घडामोडीसमवेत राज्यातही या घटनेचे पडसाद उमटताना दिसत आहेत. काश्मीर खोऱ्यात 1500 हून अधिक ओजीडब्ल्यू आणि दहशतवादाशी संबंधित असलेल्या लोकांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं आहे. एनआयए, आयबी, सीआयडी आणि आर्मी आयडब्ल्यू या सर्व गुप्तचर शाखा बैसरन हल्ल्याचा उलगडा करण्यासाठी आणि दहशतवाद्यांची ओळख पटविण्यासाठी पुरावे गोळा करीत आहेत.
Pahalgam attack News: पहलगाम येथील मृतांना मोदींनी वाहिली श्रद्धांजलीपहलगाम येथील मृतांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. ते बिहार येथील जाहीर सभेत बोलत होते. दरम्यान पहलगाम येथील गोळीबार करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
Sharad Pawar News: शरद पवार आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावरराष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आज सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. वेंगुर्ला कॅम्प येथील गावस्कर मैदान येथील हॅलिपॅडवर पवारांचे आगमन झाले असून ते वेंगुर्ल्यातील फळ संशोधन केंद्राला देण्यासाठी रवाना झाले आहेत.
Tuljapur Drugs Update : ड्रग्ज तस्करी प्रकरणी जिल्हाधिकारी आक्रमकधाराशिवचे जिल्हाधिकारी कीर्ती किरण पूजारी हे तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणी आक्रमक झाले आहेत. या प्रकरणात सहभागी पुजाऱ्यांना आई तुळजाभवानीची पूजा करता येणार नाही, असा आदेश त्यांनी दिला आहे. तुळजापूर ड्रग्स प्रकरणात 14 पुजाऱ्यांचा सहभाग असल्याच उघड झाला आहे या पुजाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून कोर्टात चार्ज शीट देखील दाखल आहे.
Santosh Deshmukh Murder Case : सरपंच हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 7 तारखेलामस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाची सुनावणी 7 मे रोजी होणार आहे. त्यामुळे या सुनावणीत कोर्ट काय निर्णय देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
Udhampur attack : पहलगामनंतर उधमपूरमध्ये दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक जवान शहीदपहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर गुरुवारी सकाळी जम्मू-काश्मीरच्या उधमपूर जिल्ह्यातील बसंतगड येथे सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत एक जवान शहीद झाल्याची माहिती समोर आली आहे.
Digital Strike : भारताचा पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईकजम्मू-काश्मिरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर कठोर कारवाई करायला सुरूवात केली आहे. सिंधू पाणी करार स्थगित केल्यानंतर आता भारताने पाकिस्तानवर डिजिटल स्ट्राईक केला आहे. त्यानुसार आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने एक्स ला भारतातील पाकिस्तान सरकारचे अधिकृत अकाउंट ब्लॉक करण्याबाबत विनंती केली होती. त्यानुसार एक्सने पाकिस्तान सरकारचे अकाउंट निलंबित केलं आहे.
Sanjay Raut : राऊतांची शिदेंच्या दौऱ्यावरून टीकामुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरकारतर्फे गिरीश महाजन यांना पाठवलं असेल तर काश्मीरला दुसरं कोणी जायची तिथे गरज नाही. यावरून तुम्ही महाराष्ट्राच्या सरकारमधील वाद दाखवत आहात. आम्ही सगळे सर्वपक्षीय बैठकीला मान्यता देतोय, विरोधी पक्ष आणि सरकार एक असल्याचं सांगतोय. पण काश्मीरच्या या दु:खद प्रसंगी महाराष्ट्रात सरकारमधलेच घटक पक्ष श्रेयवादाच्या लढाईत महाराष्ट्राचं हसं करत आहेत, अशा शब्दात ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काश्मीर दौऱ्यावर टीका केली आहे.
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मिरमध्ये अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणारपहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर तिथे अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी सरकारकडून विशेष विमानाची व्यवस्था करण्यात आली आहे. हेच पहिले विमान 83 प्रवाशांना घेऊन श्रीनगरहून मुंबईत आज येणार आहे.
भारताच्या हल्ल्याची पाकिस्तानला भीतीपहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्ताना विरोधात कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. पाकिस्तानला भारत हल्ला करेल, अशी भीती वाटते आहे. त्यामुळे भारतीय नौदलाच्या युद्धनौका अरबी समुद्रात उतरल्याने पाकिस्तानकडून समुद्रात आज युद्ध सराव करण्यात येतो आहे.
डोंबिवली, मालेगावमध्ये आज बंदकश्मीरमध्ये झालेल्या पर्यटकांच्या हत्येच्या निषेधार्थ आज (गुरुवार) डोंबिवली, मालेगावमध्ये बंद पाळण्यात येत आहे. या बंदला व्यापाऱ्यांनी प्रतिसाद दिला आहे.
शरद पवारांनी घेतली जगदाळे कुटुंबीयांची भेटपहलगामहल्ल्यात मृत्यू झालेले पुण्याती संतोष जगदाळे यांच्या कुटुंबीयांची माजी कृषीमंत्री शरद पवार यांनी भेट घेतली. शरद पवार यांच्याकडून संतोष जगदाळे यांना आदरांजली अर्पण करण्यात आली.
एकनाथ शिंदेंनी कश्मीरमध्ये पर्यटकांना दिला धीरउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे बुधवारी रात्री कश्मीरमध्ये दाखल झाले आहेत. शिंदे यांनी कश्मीरमध्ये अडकून पडलेल्या पर्यटकांची भेट घेतली तसेच त्यांना परत आणण्यासाठी सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. सरकार पर्यटकांच्या मागे ठामपणे उभे असल्याचेही ते म्हणाले.
Pahalgam attack All Party meeting : पहलगाम हल्ला, आज सर्वपक्षीय बैठककेंद्र सरकारने कश्मीर खोऱ्यात झालेल्या पहलगाम आंतकवादी हल्ल्यावर आज (गुरुवार) सर्वपक्षीय बैठक बोलवली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल. हल्ल्याविषयी रणनीती तसेच सुरक्षा उपाय योजनांबाबत यामध्ये चर्चा होण्याची शक्यता आहे. तर,