Stock Market Live Today: आज शेअर बाजार वाढीसह उघडले. सेन्सेक्स 250 अंकांनी वधारला होता आणि 80,000 च्या वर व्यवहार करत होता. निफ्टी 100 अंकांनी वाढून 24,347च्या आसपास होता. बँक निफ्टीमध्ये आज घसरण दिसून आली. निर्देशांक 29 अंकांनी घसरून 55,169 वर बंद झाला.
रिअल्टी, फार्मा आणि मेटल निर्देशांकांमध्ये सर्वाधिक वाढ झाली. ऑटो इंडेक्स देखील वर होता. एसबीआय लाईफ, एचडीएफसी लाईफ, टीसीएस, इन्फोसिस, एचसीएल टेक आणि विप्रो या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. हे निफ्टीचे टॉप गेनर्स होते. निफ्टीमध्ये अॅक्सिस बँक, नेस्ले, बीईएल, पॉवर ग्रिड, अदानी पोर्ट्स, एसबीआय हे सर्वाधिक घसरणारे शेअर आहेत.
देशांतर्गत जागतिक संकेत कमकुवत दिसत आहेत. आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारपेठांमध्ये खरेदी दिसून येत आहे. गुरुवारी त्याआधी अमेरिकन बाजारही सकारात्मक पातळीवर बंद झाले. गुरुवारी, डाऊ जोन्स इंडस्ट्रियल 487 अंकांनी वाढून 40,093.40 वर बंद झाला.
नॅस्डॅक कंपोझिटमध्ये 458 अंकांची वाढ झाली आणि तो 17,166.04 वर बंद झाला. तर S&P 500 निर्देशांक सुमारे 109 अंकांनी वाढून 5,484.77 वर बंद झाला. अमेरिका आणि चीनमधील व्यापार युद्धात काही प्रमाणात शिथिलता येण्याची आशा आहे, ज्यामुळे बाजारात सकारात्मक वातावरण आहे.
आजच्या व्यवहारात प्रमुख आशियाई बाजारपेठांमध्ये खरेदी दिसून येत आहे. आशियाबद्दल बोलायचे झाले तर, GIFT NIFTY 0.39 टक्क्यांनी वाढला आहे तर Nikkei 225 1.37 टक्क्यांनी वाढला आहे.
स्ट्रेट टाईम्स 0.10 टक्क्यांनी वधारला आहे तर हँग सेंग सुमारे 1.30 टक्क्यांनी वाढला आहे. तैवान वेटेड देखील 2.06 टक्क्यांनी वाढला आहे तर कोस्पी 0.85 टक्क्यांनी वाढताना दिसत आहे. तर शांघाय कंपोझिटमध्ये 0.04 टक्क्यांची घसरण दिसून येत आहे.
आज शुक्रवारी, 30 पैकी 25 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात उघडले आणि उर्वरित 5 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात उघडले.
दुसरीकडे, आज निफ्टी 50 मधील 50 कंपन्यांपैकी 37 कंपन्यांचे शेअर्स वाढीसह हिरव्या रंगात व्यवहार करत आहेत आणि उर्वरित 13 कंपन्यांचे शेअर्स घसरणीसह लाल रंगात उघडले.
सेन्सेक्स कंपन्यांमध्ये, इटरनल (झोमॅटो) चे शेअर्स आज सर्वाधिक 0.89 टक्के वाढीसह उघडले आणि टेक महिंद्राचे शेअर्स आज सर्वाधिक 3.52 टक्के घसरणीसह उघडले.