अमरावती शहरात राहणाऱ्या 118 पाकिस्तानी हिंदूंना भारत सरकारकडून मोठा दिलासा मिळाला आहे. सध्या अमरावतीमध्ये राहणारे 118 हिंदू पाकिस्तानी नागरिक हे लॉन्ग टर्म व्हिसावर पाकिस्तानातून भारतात आले आहेत. यातील काहींनी भारतात व्यवसायही सुरु केला आहे. हे सगळे पाकिस्तानी नागरिक सिंध प्रांतातले असून सध्या त्यांनी भारतीय नागरिकत्व मिळावं म्हणून केंद्र सरकारकडे अर्ज केला आहे. गेली दहा ते पंधरा वर्षं ते भारतात राहत आहेत. सध्या त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी सुरु आहे.
Live : अमरनाथ यात्रा नियोजनानुसार सुरू होणार : सुरिंदर चौधरीपहलगाम नुकत्याच झालेल्या प्राणघातक हल्ल्यानंतरही यावर्षीची अमरनाथ यात्रा नियोजनानुसार सुरू होईल, असे जम्मू आणि काश्मीरचे उपमुख्यमंत्री सुरिंदर चौधरी यांनी शुक्रवारी सांगितले. तीर्थयात्रा ही वैयक्तिक श्रद्धेची बाब आहे आणि हिंसाचाराच्या कृत्यांमुळे ती थांबवली जाणार नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. चौधरी म्हणाले, ‘‘अमरनाथ यात्रा ही आध्यात्मिक अनुभूती असल्याचे सांगत ज्यांना या यात्रेला जायचे आहे, ते स्वेच्छेने जाऊ शकतील.
Live : पुण्यात पाकिस्तानचा झेंडा तुडवलापुण्यात पाकिस्तानचा झेंडा तुडवला.
पहलगाम हल्ल्याच्या विरोधात पुण्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक.
पुण्यातील गुडलक चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी केलं आक्रमक आंदोलन.
कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा व्हिडिओ रस्त्यावर लोळवत आणि तुडवत पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी.
शंखनाद करून हिंदुत्ववादी संघटनांनी केलं जोरदार आंदोलन.
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील २ जणांनी आपला जीव गमावला
Pahalgam Terror Attack LIVE Updates: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग – राष्ट्रीय तपास यंत्रणेचं पथक महाराष्ट्रातल्या पीडित कुटुंबांची चौकशी सुरूजम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या तपासाला वेग – राष्ट्रीय तपास यंत्रणेचं (NIA) पथक महाराष्ट्रातल्या पीडित कुटुंबांची चौकशी करत आहे.
LIVE Updates: योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खेरी येथील शारदा नदीच्या जलवाहिनीकरण कामाची केली पाहणीउत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी लखीमपूर खेरी येथील शारदा नदीच्या जलवाहिनीकरण कामाची पाहणी केली.
Pahalgam Terror Attack LIVE Updates: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आर्थिक आणि इतर प्रकारचं पाठबळ देणाऱ्यांनाही जबाबदार धरावं, अशी स्पष्ट मागणी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं केलीपहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर आता संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं (UNSC)**ही आपली कडक भूमिका स्पष्ट केली आहे. या हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध करत दहशतवाद्यांसह, त्यांना आर्थिक आणि इतर प्रकारचं पाठबळ देणाऱ्यांनाही जबाबदार धरावं, अशी स्पष्ट मागणी परिषदेनं केली आहे
Pahalgam Terror Attack LIVE Updates: अमेरिका भारतासोबत - अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्डअमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गॅबार्ड म्हणाल्या की, पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील दोषींवर कारवाई करण्यासाठी अमेरिका भारतासोबत आहे.
कोणत्याही राष्ट्राच्या विकासाचा आणि यशाचा पाया म्हणजे त्याचे तरुणपण. जेव्हा तरुणाई राष्ट्र उभारणीचा भाग असते, तेव्हा राष्ट्र जलद प्रगती करते आणि जगात आपली ओळख निर्माण करते :- पंतप्रधान नरेंद्र मोदी
Tahawwur Hussain Rana LIVE Updates: मुंबई गुन्हे शाखेचे एक पथक दिल्लीत पोहोचले आणि २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणाची चौकशी केलीबुधवारी मुंबई गुन्हे शाखेचे एक पथक दिल्लीत पोहोचले आणि २६/११ दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा याची चौकशी केली. मुंबई पोलिसांनी दहशतवादी तहव्वुर हुसेन राणा याची ८ तासांपेक्षा जास्त काळ चौकशी केली. तहव्वुर राणा टाळाटाळ करणारी उत्तरे देत आहे आणि तपासात सहकार्यही करत नाही: मुंबई पोलिस
PM Modi LIVE Updates: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ५१,००० हून अधिक नवनियुक्त तरुणांना नियुक्ती पत्रे वाटलीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध सरकारी विभागांमध्ये ५१,००० हून अधिक नवनियुक्त तरुणांना नियुक्ती पत्रे वाटली.
Bhiwandi Fire LIVE Updates: भिवंडीतील श्री मुनिसुव्रत कॉम्प्लेक्स गोदामाला आग; अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळीभिवंडीतील श्री मुनिसुव्रत कॉम्प्लेक्स गोदामाला आग लागल्याची घटना समोर आली आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी उपस्थित आहेत.
Pahalgam Terror Attack LIVE Updates: आणखी एका दहशतवाद्याचे घर जमीनदोस्त, सुरक्षा दलांनी आयईडी स्फोटाने उडवून दिलेपहलगाम हल्ल्यानंतर कारवाई, आणखी एका दहशतवाद्याचे घर जमीनदोस्त; सुरक्षा दलांनी आयईडी स्फोटाने ते उडवून दिले.
Pahalgam Terror Attack LIVE Updates: काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या विविध चौक्यांकडून गोळीबार करण्यात आला: भारतीय लष्कर२५-२६ एप्रिल २०२५ च्या रात्री, काश्मीरमधील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या विविध चौक्यांकडून गोळीबार करण्यात आला. भारतीय जवानांनी योग्य प्रत्युत्तर दिले. कोणतीही जीवितहानी झालेली नाही: भारतीय लष्कर
Pahalgam Terror Attack LIVE Updates: संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलासंयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या सदस्यांनी २२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केला, ज्यामध्ये किमान २६ लोकांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. या निंदनीय दहशतवादाच्या कृत्याचे गुन्हेगार, आयोजक, वित्तपुरवठा करणारे आणि प्रायोजक यांना जबाबदार धरले
निजामपूरच्या माजी उपसरपंचाला पहलगाम दहशतवादी हल्ल्या संदर्भात सोशल मीडियावर पोस्ट करण महागात पडले आहे, सोशल मीडियावर द्वेषपूर्ण पोस्ट केल्याप्रकरणी निजामपूर ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा विद्यमान गटनेत्यावर गुन्हा दाखल झाला आहे,
Nagpur live: एम्समध्ये मनुष्यबळ वाढ, 507 पदांच्या भरतीला मंजुरीनागपूरातील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) ला मोठा दिलासा मिळाला असून, 507 नव्या पदांच्या भरतीला केंद्र सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. देशभरातील एम्ससाठी एकूण 711 नव्या पदांना मंजुरी मिळाली असली, तरी नागपूरच्या एम्सला सर्वाधिक 507 पदे मिळाली आहेत. यामुळे नागपूर एम्स पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. 2018 मध्ये स्थापन झालेल्या या एम्सने सप्टेंबर 2019 पासून मीहान येथे बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) सेवा सुरू केली, तर 2020 मध्ये अकस्मित विभाग आणि वॉर्ड कार्यान्वित झाले. आता 400 ज्युनियर आणि सीनियर निवासी डॉक्टरांची पदे आणि 70 सहाय्यक पदांसह नागपूर एम्स अधिक सक्षमपणे रुग्णसेवा देण्यास सज्ज आहे.
MP News : बालाघाटमध्ये सुरक्षा दलांकडून मोठी कारवाई; सैनिकांनी ४ महिला नक्षलवाद्यांचा केला खात्मामध्य प्रदेशातील बालाघाटमध्ये सुरक्षा दलांनी मोठी कारवाई केली आहे. येथे सैनिकांनी ४ महिला नक्षलवाद्यांना ठार मारले आहे. त्या सर्वांवर एकूण ६२ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. मध्यप्रदेशासह देशातील सर्व नक्षलग्रस्त भागात एक मोहीम राबविली जात आहे, ज्यामध्ये आतापर्यंत हजारो नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केले आहे आणि शेकडो नक्षलवादी चकमकीत मारले गेले आहेत.
Pune Unseasonal Rain : पुणे शहरासह जिल्ह्यांत आज पावसाची शक्यता, हवामान खात्याने वर्तविला अंदाजपुणे शहरासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तर, राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आज आणि उद्या येलो अलर्ट जारी केला आहे. पुणे शहरासह जिल्ह्यांत देखील आज दिवसभरात पावसाची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे.
SSC-HSC Result : दहावी-बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्यात होणार जाहीरमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी - बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होणार आहे. मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर होईल. याबाबत लवकरच तारीख जाहीर केल्या जातील, असेही बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.
Indian Army : काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार२५-२६ तारखेच्या रात्री काश्मीरमधील नियंत्रण रेषेवरील विविध पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यांवर गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्याने शस्त्रांनी योग्य प्रत्युत्तर दिले. यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
पंढरपूर : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.
Sanjay Sawkare : वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारेंना 'स्वाभिमानी'च्या कार्यकर्त्यांचे काळे झेंडेहातकणंगले : स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून राज्यातील शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी व शक्तिपीठ रद्द व्हावे, या मागणीसाठी कोल्हापूर दौऱ्यावर असलेल्या वस्त्रोद्योगमंत्री संजय सावकारे यांना हातकणंगलेजवळ काळे झेंडे दाखविण्यात आले. कोल्हापूरहून जयसिंगपूर येथे आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्या निवासस्थानी जात असताना स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी गनिमी काव्याने त्यांना काळे झेंडे दाखविले. दरम्यान, ही घटना घडल्यानंतर जयसिंगपूर व हातकणंगले पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली आहे.
Mahabaleshwar Tourism Festival : महाबळेश्वरला शुक्रवारपासून वाहतुकीत बदलसातारा/भिलार : महाबळेश्वर येथे जिल्हा प्रशासन व पर्यटन विकास महामंडळाच्या वतीने दोन ते चार मे दरम्यान ‘पर्यटन महोत्सव - २०२५’चे आयोजन करण्यात आले आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होणार असल्याने वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. पोलिस प्रशासनाने या कालावधीत महाबळेश्वरला जाणाऱ्या मार्गावरील वाहतुकीत बदल केला आहे.
Azadpur Bandh : आशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आझादपूरमध्ये पुकारण्यात आला बंदआशियातील सर्वांत मोठी बाजारपेठ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आझादपूरमध्ये शनिवारी बंद पुकारण्यात आला आहे. सर्व व्यापाऱ्यांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन व्यापारी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे. बाजारपेठा बंद असल्या तरी शहरातील परिवहन व्यवस्था मात्र सुरळीतपणे सुरू होती.
Delhi News : दिल्लीतील व्यापाऱ्यांकडून कडकडीत बंद, लाल किल्ल्यासमोर 'पाकिस्तान मुर्दाबाद'ची घोषणाबाजीनवी दिल्ली : जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. महानगरातील नऊशे पेक्षा जास्त बाजारपेठा व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या होत्या. व्यापारी तसेच नागरिकांनी लाल किल्ल्यासमोर जमत ‘पाकिस्तान मुर्दाबाद’ची घोषणाबाजी केली. पाकिस्तानला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची मागणी यावेळी करण्यात आली. भाजपचे खासदार प्रवीण खंडेलवाल हे यावेळी उपस्थित होते.
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची घरे उद्ध्वस्त, दक्षिण काश्मीरमध्ये सुरक्षा दलांची शोध मोहीमLatest Marathi Live Updates 26 April 2025 : पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यातील हल्लेखोर आणि ‘लष्करै तैयबा’चे दहशतवादी आदिल हुसैन ठोकेर आणि आसिफ शेख यांची घरे सुरक्षा दलांनी नष्ट केली. तसेच दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर इस्राईल, अर्जेंटिना, इजिप्त आणि नेपाळच्या राजदूतांनी तसेच अनेक देशांच्या मुत्सद्यांनी परराष्ट्रमंत्री ए. जयशंकर यांची भेट घेऊन भारताला पाठिंबा दर्शविला. पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ दिल्लीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारी कडकडीत बंद पाळला. महानगरातील नऊशे पेक्षा जास्त बाजारपेठा व्यापाऱ्यांनी बंद ठेवल्या होत्या. पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली आहे. मंदिरात मोबाईल आणि कॅमेरा घेऊन जाण्यास बंदी करण्यात आली आहे. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..