शुभमन गिल हा भारताचा एक दिग्गज फलंदाज आहे, तसेच तो आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स संघाचा कॅप्टन देखील आहे. त्याच्या नेतृत्वात सध्या गुजरात टायटन्स उत्तम प्रदर्शन करत आहे. आयपीएलच्या चालू हंगामामध्ये गुजरातची टीम पॉइंट टेबलमध्ये टॉपला आहे. त्यामुळे शुभमन गिलचं कौतुक होत आहे, गिल हा एक शांत आणि संयमी कर्णधार आहे. मात्र गिल हा नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्याचं नाव कधी बॉलिवूड अभिनेत्रींशी तर कधी सारा तेंडुलकरसोबत जोडण्यात आलं. अखेर आपल्या रिलेशनशिपबाबत आता शुभमन गिलने मोठा खुलासा केला आहे. तो एका मुलाखतीदरम्यान बोलत होता.
शुभमन गिलने एका मुलाखतीमध्ये म्हटलं आहे की, मी गेल्या तीन वर्षांपासून सिंगल आहे, माझ्यासंदर्भात अनेक अफवा पसरवण्यात आल्या, अंदाज व्यक्त केले जात आहेत. माझं नाव वेगवेगळ्या व्यक्तींसोबत जोडलं जातं. कधी-कधी तर हे एवढं विचित्र असतं की मी ज्या व्यक्तीला आयुष्यात कधी पाहिलेलं देखील नाही, किंवा मी भेटलेलो देखील नाही, अशा व्यक्तीसोबत माझं नाव जोडलं जातं. मला सुद्धा लोकांकडूनच कळतं की मी आता या व्यक्तीच्या प्रेमात वगैरे आहे ते, हे सर्व ऐकून मला आश्चर्य वाटतं.
सध्या तरी माझा पूर्ण फोकस हा फक्त माझ्या करिअरवर आहे, त्यामुळे अशा अफवांवर आता पूर्णविराम लागायला हवा, मी गेल्या तीन वर्षांपासून सिंगल आहे. दरम्यान शुभमन गिलचं नाव सारा तेंडुलकर सोबतच अभिनेत्री अनन्या पांडेसोबत देखील जोडण्यात आलं होतं. मात्र या सर्व अफवा असल्याचं आता गिलने स्पष्ट केलं आहे. या दोघींसोबतच रिद्धिमा पंडित, सोनम बाजवा आणि अवनीत कौर यांच्यासोबत देखील गिलचं नाव जोडण्यात आलं होतं. मात्र या सर्व अफवा असल्याचं गिलने आता स्पष्ट केलं आहे. मी माझ्या करिअरवर सध्या फोकस करत आहे, त्यामुळे माझ्याकडे आतातरी वेळ नाही, असंही गिलने म्हटलं आहे, त्यामुळे आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे.