Crime News : बजरंगवाडीतून तडीपार गुंडाला अटक
esakal April 26, 2025 10:45 PM

नाशिक- शहर-जिल्ह्यातून तडीपारीची कारवाई करूनही शहरात वावरणाऱ्या तडीपाराला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आदित्य सुनील गायकवाड उर्फ टग्या मोरे (वय २१, रा. महादेव मंदिराशेजारी, बजरंगवाडी) असे तडीपार गुंडाचे नाव आहे.

त्यास दोन वर्षांसाठी हद्दपार केलेले असताना त्याचा वावर शहरातच होता. पोलिस त्याच्या मागावर असताना बुधवारी (ता. २३) रात्री तो बजरंगवाडीतील महादेव मंदिर परिसरात असल्याची खबर मिळताच त्यास अटक केली. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत गुन्हा दाखल आहे.

महिलेचा विनयभंग

वैद्यनगर येथे इमारतीत फर्निचरचे काम करणाऱ्या परप्रांतीय संशयिताने साफसफाई करणाऱ्या महिलेचा विनयभंग केल्याची घटना घडली. लक्ष्मण भारती असे संशयिताचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीनुसार, वैद्यनगर येथे नवीन बांधकाम सुरू असलेल्या इमारतीत बुधवारी (ता. २३) सकाळी पीडिता साफसफाई करण्यासाठी आली होती. त्या वेळी जिना झाडत असताना तिला आमिष दाखविले व त्याने पैसे दाखवून विनयभंग केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसांत विनयभंगाचा गुन्हा दाखल असून, हवालदार पवार तपास करत आहेत.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.