Kavya Maran ज्याच्यावर चिडली, त्याचा 'स्ट्रगल' तिला माहीत नाही! SRH मधील भारतीय खेळाडू विकायचा परफ्यूम
esakal April 26, 2025 10:45 PM

Harshal Patel’s struggle deserves respect : ने इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये पहिल्यांदाच चेन्नई सुपर किंग्सला चेपॉकवर पराभूत केले. चेन्नई सुपर किंग्सचा संपूर्ण संघ १५४ धावांवर माघारी पाठवल्यानंतर SRH ने १८.४ षटकांत ५ गडींच्या मोबदल्यात हे लक्ष्य पार केले. हर्षल पटेलने २८ धावांत ४ विकेट्स घेऊन प्लेअर ऑफ दी मॅचचा मान मिळवला. पण, या सामन्यात SRH ची मालकीण काव्या मारन ( ) त्याच्यावर चिडलेली दिसली. हर्षलकडून एक सोपा झेल टाकला गेला आणि ते पाहून काव्याला प्रचंड राग आला होता. पण, काव्याला हर्षलचा इथपर्यंतचा स्ट्रगल कदाचित माहीत नाही.

हर्षलने २०२१ च्या आयपीएलमध्ये ३२ विकेट्स घेताना एका पर्वात सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या ड्वेन ब्राव्होचा विक्रमाशी बरोबरी केली होती. त्या पर्वात RCB कडून खेळणाऱ्या हर्षलने पर्पल कॅप जिंकली होती. त्यानंतर २०२४ च्या पर्वात पंजाब किंग्सकडून खेळताना त्याने २४ विकेट्स घेत पुन्हा पर्पल कॅप नावावर केली. यंदाच्या पर्वात तो १३ विकेट्स पर्पल कॅपच्या शर्यतीत चौथ्या क्रमांकावर आहे.

हर्षल पटेलच्या गोलंदाजीत विविधता आहे आणि परिस्थितीनुसार मारा करण्याचे त्याच्याकडे कौशल्य आहे. त्यामुळेच त्याला डेथ बॉलिंग म्हणजेच शेवटच्या षटकांत अचूक मारा करणारा गोलंदाज म्हणून ओळखले जाते. हर्षलने आयपीएलमध्ये ६६ सामन्यांत १०२ विकेट्स घेतल्या आहे आणि २०२१ मध्ये गोलंदाजाने आयपीएलमध्ये घेतलेल्या या सर्वाधिक विकेट्स आहेत. त्यानंतर युझवेंद्र चहल ९३ विकेट्ससह दुसऱ्या स्थानावर आहे.

हर्षल पटेलचा इथपर्यंतचा प्रवास हा सोपा नव्हता. तो १७ वर्षांचा असताना त्याचे वडील अमेरिकेत स्थायिक झाले. त्याचे वडील तिथे सातरही दिवस काम करायचे. हर्षलने याबाबत सांगितले की, मी पण न्यू जर्सी येथील एलिझाबेथ येथे एका परफ्यूम स्टोअरमध्ये पाकिस्तानी मुलासोबत काय करायचो. मला तेव्हा दिवसाचे ३५ डॉलर मिळायचे. गुजराथी माध्यमातून शिक्षण घेतलं असल्याने मला इंग्रजी बोलता येत नव्हते.

हर्षलने २००८-०९ साली १९ वर्षांखालील विनू मंकड ट्रॉफीत गुजरातचे प्रतिनिधित्व करताना २३ विकेट्स घेतल्या होत्या. त्याचा भाऊ तपन याने हर्षलमधील प्रतिभा ओळखली अन् त्याने भारतात जाऊन क्रिकेट खेळावे असे त्याने त्याला सांगितले. त्यानंतर हर्षलने मागे वळून पाहिले नाही. कोरोना काळात त्याच्या बहिणीचे ( ३३ वर्ष) निधन झाले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.