पहलगाममध्ये हल्ला झाल्यानंतर 12 लाखांहून अधिक बुकिंग रद्द करण्यात आले आहे.
पहलगाम दरवर्षी लाखो पर्यटकांना आकर्षित करते. पर्यटनासाठी हे एक आवडते ठिकाण आहे.
एका अंदाजानुसार, पहलगामला दरवर्षी पर्यटनातून 400 कोटी रुपयांपर्यंतची कमाई होते.
हॉटेल, रिसॉर्ट आणि होमस्टे मालक एका हंगामात लाखो रुपये कमावतात. एका खोलीचा सरासरी दर ₹३,००० ते ₹१०,००० पर्यंत असतो.
स्थानिक लोकांचे उत्पन्नही पर्यटकांवर अवलंबून असते. एक जण दररोज ₹१,०००-₹२,५०० कमवतो.
दहशतवादी हल्ल्यानंतर 12 लाखांहून अधिक बुकिंग रद्द करण्यात आली आहेत. यामुळे हॉटेल्स, टॅक्सी, गाईड, या सर्वांना मोठे नुकसान झाले आहे.
या हल्ल्यामुळे मे-जूनचा पीक सीझन बंद झाला आहे. केवळ हॉटेल्सना 50 कोटी रुपयांपेक्षा जास्त नुकसान झाल्याचा अंदाज आहे.
परिस्थिती सुधारल्यानंतर पर्यटक परत येतील अशी स्थानिक व्यावसायिकांना आशा आहे. पण सध्या तरी पर्यटन ठप्प आहे.