Misha Agarwal Passed Away: कंटेंट क्रिएटर आणि इन्फ्लुएंसर मीशा अग्रवालचे वयाच्या अवघ्या 24व्या वर्षी निधन झाले आहे. तिच्या निधनाची बातमी सोशल मीडियावर येताच चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. 24 एप्रिल रोजी मीशाने जगाचा निरोप घेतला आणि येत्या दोन दिवसांनी, 26 एप्रिलला तिचा 25वा वाढदिवस आहे. तिच्या अकस्मात मृत्यूने तिचे कुटुंबीय, मित्र आणि चाहते पूर्णपणे हादरले आहेत.
मीशा अग्रवाल तिच्या मजेदार रील्स आणि विनोदी कंटेंटसाठी प्रसिद्ध होती. इंस्टाग्रामवर ‘The Misha Agrawal Show’ या अकाउंटवरून तिच्या निधनाची अधिकृत माहिती दिली गेली आहे. तिच्या कुटुंबीयांनी पोस्ट करत लिहिले की, "आमच्या प्रिय मीशाच्या निधनाची दुःखद बातमी शेअर करताना आमचे मन खूप जड झाले आहे. तुम्ही तिला आणि तिच्या कामाला जे प्रेम आणि आधार दिला, त्यासाठी तुमचे आभार. आम्ही अजूनही या दुःखातून सावरू शकलेलो नाही."
मीशाच्या मृत्यूने चाहत्यांना धक्का बसला
चा अचानक मृत्यू कसा झाला याबद्दल कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पण ही बातमी त्याच्या वरील ३४३ हजार फॉलोअर्ससाठी मोठा धक्का आहे. या पोस्टवर अनेक लोकप्रिय व्यक्तींनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. पण काही नेटकरी या पोस्टला प्रॅन्क बोलत असून ती २ दिवसांनी याचा खुलासा करणार असे म्हणत आहे. तिच्या या पोस्टवरील कमेंटबॉक्स बंद केल्याने चाहते आणखी गोंधळले आहेत.
नेटिझन्सना वाटतोय प्रँक
अभिनेत्री शिबानी बेदीने लिहिले, 'मला यावर विश्वास बसत नाहीये.' याशिवाय सुहानी शाह आणि नगमा मिर्झाकर यांनीही मीशाच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. काही नेटकरी याला पब्लिसिटी स्टंट आणि प्रँक असेही म्हणत आहेत. एका नेटकाऱ्यानेने कमेंट केली मीशा २६ तारखेला येऊन सगळ्यांना धक्का देईल.