Nana Patekar And Paresh Rawal: बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेते परेश रावल यांनी अलीकडेच एका मुलाखतीत नाना पाटेकर यांच्याबद्दल एक मनोरंजक किस्सा शेअर केला आहे. त्यांनी सांगितले की, एकदा नाना पाटेकर यांनी एका निर्मात्याला जेवणासाठी घरी बोलावलं आणि जेवणानंतर ताटं घासायला लावल. हा किस्सा ऐकून सर्वांनाच आश्चर्य वाटले.
नाना पाटेकरांनी निर्मात्याला भांडी धुवायला लावली
परेश रावल यांनी नुकताच एका यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत नाना पाटेकर यांच्याशी संबंधित एक किस्सा शेअर केला. ते म्हणाले, "एक निर्माता होता. मी त्याचे नाव घेणार नाही. नानांनी त्याला एके दिवशी घरी येण्यास सांगितले. त्याने विचारले, 'तू मटण खातोस का?' निर्मात्याने जेवण केले. जेवण झाल्यावर नाना म्हणाले - 'तू जेवलास ना? आता भांडी धुऊन ये.'
या प्रसंगानंतर, त्या निर्मात्याने नानांच्या साधेपणाची आणि प्रामाणिकपणाची प्रशंसा केली. त्याने सांगितले की, नाना पाटेकर यांच्यासारख्या मोठ्या कलाकाराकडून अशी शिकवण मिळणं, हे त्याच्यासाठी भाग्याचं होतं. नानांचा हा स्वभाव त्यांच्या चाहत्यांमध्येही प्रसिद्ध आहे.
पुढे म्हणाले, एका चित्रपटासाठी 1 कोटी रुपये मानधन घेतात. त्यांच्या अभिनय क्षमतेला आणि प्रामाणिकपणाला पाहता, हे मानधन योग्यच आहे. नाना पाटेकर हे बॉलिवूडमधील एक आदर्श व्यक्तिमत्त्व मानले जातात, ज्यांच्याकडून सर्वांनी शिकण्यासारखं खूप काही आहे