Maharashtra News Live Updates : - पुण्यात हुल्लडबाजांकडून मनोरंजनासाठी एअरगनने गोळीबार
Saam TV April 27, 2025 01:45 AM
पुण्यात हुल्लडबाजांकडून मनोरंजनासाठी एअरगनने गोळीबार

पुण्यात हुल्लडबाजांकडून मनोरंजनासाठी एअरगनने गोळीबार

२ जणांनी केला एअरगनमधून गोळीबार

रस्त्यावर थांबवून हुल्लडबाजी करण्यासाठी या तरुणांनी केला गोळीबार

पुण्यातील कोंढवा परिसरात ही घटना

साळुंखे विहार परिसरात एका इमारतीच्या घराच्या २ काचा फुटल्या

ज्या घरावर हुल्लडबाज यांनी चेष्टा करत गोळीबार केला त्या घरातील सर्व लोकं सुरक्षित

या घटनेत कोणी ही जखमी नाही

या घटनेतील एका तृतीयपंथ्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे

डोंबिवलीतील शिवमंदिर स्मशानभूमीतील संतापजनक प्रकार

डोंबिवली मधील शिव मंदिर स्मशानभूमीत लहान मुलांना लाकडं उचलण्याच्या कामाला जुंपल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाला. अंत्यविधी साठी लागणारी ही लाकडे ही लहान मुले उचलून स्टॅन्ड पर्यंत नेत होती.या व्हिडिओमुळे केडीएमसी प्रशासनाचा गलथान कारभार समोर आला आहे. यावरून ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी अतिशय दुर्दैवी आणि चीड आणणारी बाब आहे अस सांगत प्रशासनाला लक्ष केले प्रशासनाने संबंधित ठेकेदाराचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करावे अशी मागणी केली आहे .तर शिंदे गटाचे आमदार राजेश मोरे यांनी या व्हिडिओमध्ये घडलेली घटना ही अत्यंत चुकीची आहे. संबंधित स्मशानातील ठेकेदाराचे कॉन्ट्रॅक्ट रद्द करण्यासंदर्भात केडीएमसी आयुक्ताकडे मागणी करणार असल्याचे सांगितले

पहलगाम हल्ल्याच्या निषेधार्थ करवीर शिवसेनेने जाळले पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांचे पोस्टर..

काश्मीर खोऱ्यातील पहेलगाम इथं दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून 28 पर्यटकांच्या हत्या केली. याच्या निषेध करण्यासाठी करवीर तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने तावडे हॉटेल चौकात पाकिस्तानी ध्वजासह अतिरेक्यांची प्रतिमा असलेले पोस्टर जाळून तीव्र निषेध करण्यात आला. यावेळी मृतांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी "जलादो जलादो पाकिस्तान जलादो" "पाकिस्तान मुर्दाबाद" अशा घोषणा देत शिवसैनिकांनी परिसर दणाणून सोडला.

नाशिक: कबड्डी स्पर्धेत एक नंबर आल्याचा राग मनात धरत विद्यार्थिनींची फ्री स्टाईल हाणामारी

कबड्डी स्पर्धेत एक नंबर आल्याने त्याचा राग मनात धरत विद्यार्थिनींची फ्री स्टाईल हाणामारी. काल दुपारच्या सुमारास पवननगर येथील एका विद्यालयातील विद्यार्थिनींनी मिळून एका विद्यार्थिनीला मारहाण केल्याचा प्रकार घडलाय. या विद्यार्थिनींची फ्री स्टाईल हाणामारी बघण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. तीन ते चार दिवसांपूर्वी पवन नगर येथील विद्यालयात कबड्डी स्पर्धा ठेवण्यात आली होती. त्यामध्ये एक विद्यार्थिनी स्पर्धा जिंकल्याने त्याचा राग मनात ठेवून दुसऱ्या गटातील विद्यार्थिनींनी पेपर सुटल्यावर त्याचा राग काढला. हा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यामध्ये कैद झाला. विद्यालयातील शिक्षकांना ही बाब समजताच त्यांनी पालकांना बोलून विद्यार्थिनींना समज दिली

नाशिकच्या सिन्नरमध्ये तरुणाची टोळक्याकडून घरात घुसून हत्या

- नाशिकच्या सिन्नरमध्ये तरुणाची टोळक्याकडून घरात घुसून हत्या

- नाशिक ग्रामीणच्या वावी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घटना

- प्रवीण कांडळकर वय 27 अस मयत तरुणाच नाव

- टोळक्याने मयूर या तरुणाच्या घरात घुसून घराचे दरवाजे तोडूनकोयता, कुऱ्हाड, तलवार आणि चॉपरने केला हल्ला

- पूर्व वैमन्यसातून हे हत्याकांड झाल्याची प्राथमिक माहिती

- संबधित तरुणाने हत्या करणाऱ्या टोळक्याच्या विरोधात तक्रार यापूर्वीही वावी पोलिसांमध्ये देण्यात आली होती तक्रार

- मात्र पोलिसांनी तक्रारीला गांभीर्याने न घेतल्याने या टोळक्याने आज ही हत्या केल्याचा मयत तरुणाच्या कुटुंबीयांचा पोलिसांवर आरोप

- मयत मुलाच्या कुटुंबीयांचा रुग्णालयाबाहेर आक्रोश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे पी नड्डा आज पुणे दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जे पी नड्डा आज पुणे दौऱ्यावर

मुख्यमंत्री जम्मू काश्मिरमधील दहशतवादी हल्यात मृत्यू झालेले कौस्तुभ गनबोटे यांच्या घरी सांत्वनपर भेट देणार

देवेंद्र फडणवीस आणि जे पी नड्डा एकत्र गनबोटे यांच्या कुटुंबियांची भेट घेण्याची शक्यता

पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते आयोध्या दर्षण ट्रेनला दाखविण्यात आली हिरवी झेंडी

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यातून जवळपास आठशे लाभार्थी भाविकांना ट्रेनच्या माध्यमातून अयोध्या येथे रामलल्लांचे दर्शन घडणार आहे, पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते या ट्रेनला हिरवी झेंडी दाखविण्यात आली आहे, यावेळी पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सर्व लाभार्थी भाविकांवर पुष्पवृष्टी करून त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.

Pune News: पुण्यात पाकिस्तानचा झेंडा तुडवला; हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

पहलगाम हल्ल्याच्या विरोधात पुण्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

पुण्यातील गुडलक चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी केलं आक्रमक आंदोलन

कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा व्हिडिओ रस्त्यावर लोळवत आणि तुडवत पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

शंखनाद करून हिंदुत्ववादी संघटनांनी केलं जोरदार आंदोलन

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील २ जणांनी आपला जीव गमावला

पहलगाम घटनेच्या निषेधार्थ अमरावतीमध्ये तीव्र आंदोलन..

जम्मू काश्मीरमधील पहलगाम घटनेच्या निषेधार्थ अमरावतीच्या चांदूरबाजार मध्ये विश्व हिंदू परिषद बजरंग दल आणि सर्वच हिंदुत्ववादी संघटनांच तीव्र आंदोलन..

पाकिस्तानच्या दहशतवाद्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळला, काही वेळ चक्काजाम,पाकिस्तान विरोधात जोरदार नारबाजी..

चांदूरबाजार शहरातील जयस्तंभ चौकात धरणे आंदोलन व मृत्युमुखी पावलेल्या निष्पाप नागरिकांना श्रद्धांजली देण्यात आली.

तसेच यावेळी टायर जाळून निषेध करण्यात आला आहे.

Pahalgam Attack: मॅगी खात होता म्हणून वाचला नाशिकच्या पर्यटकाचा जीव

केवळ मॅगी मुळे नाशिकच्या पर्यटकांचा पहलगाम आल्यामुळे जीव वाचला. ज्यावेळी बालकांमध्ये पर्यटकांवर दहशतवाद्यांचा भाग हल्ला झाला त्यावेळी ते पार्किंगमध्ये मॅगी खात होते. मॅगी आवडल्याने त्यांनी पुन्हा मॅगीची ऑर्डर दिली त्यामुळे त्यांचा बराच वेळ पार्किंगमध्ये गेला. त्याचवेळी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ल्याची घटना घडली. या पर्यटकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अभिजीत सोनवणे यांनी

Beed News: चंदन तस्कर टोळीवर बीडच्या पाटोदा पोलिसांचा छापा ८ आरोपी जेरबंद

- ५ लाख ९६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त.

- 56 किलो चंदनासह 4 मोटारसायकली व दोन मोबाईल जप्त.

- सौताडा शिवारातील जामखेड रोड व वंजारा फाटा परिसरातून चंदनाची अवैध वाहतूक होणार असल्याची गोपनीय माहिती बीड पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी हि कारवाई करून आठ आरोपींना अटक केली आहे.

- पाटोदा पोलीस ठाण्यात आठ जणांविरोधात गुन्हा दाखल.

- बीड जिल्ह्यात पोलिसांकडून अवैध धंद्यांवर आळा घालण्याचे प्रयत्न सुरू.

बीडच्या माजलगावमध्ये आणखी एका पतसंस्थेत घोटाळा

बीडच्या माजलगाव येथील मराठवाडा अर्बन क्रेडिट सोसायटीमध्ये 15 कोटी रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले.. या प्रकरणात पतसंस्थेचे अध्यक्ष कर्मचारी लेखा परीक्षक व मालमत्ता खरेदीदार अशा 24 जणांच्या विरोधात माजलगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.. बीड व माजलगाव मध्ये गेल्या काही दिवसात पतसंस्थांमध्ये अपहाराचे प्रकार समोर आले होते.. त्यामध्ये आता आणखी या पतसंस्थेची भर पडली असून आरोपी अद्याप फरार आहेत.

जम्मू आणि काश्मीरला गेलेले पर्यटक सुखरूप अकोल्यात परतले...

जम्मू आणि काश्मीरला गेलेले 31 पर्यटक अकोला जिल्ह्यात सुखरूप परतलेय.. कालं खाजगी ट्रॅव्हल्सने मुंबई येथून ते अकोल्याकडे निघाले होते. आता दीड वाजता ते अकोल्यात दाखल झालेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर अनेकांना काळजी लागली होती. आता सर्व पर्यटक अकोल्यात सुखरूप पोहचले आहेत.. वंचित बहुजन आघाडी तसेच भाजपच्या वतीने सर्वांच स्वागत करण्यात आले.. दरम्यान, याच पर्यटकांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी अक्षय गवळी यांनी.. यावेळी काही पर्यटकांचे अश्रू अनावर झाले होते..

Nahsik : पहलगाममध्ये अडकलेले १८ पर्यटक माघारी आले

नाशिकहून काश्मीरला गेलेले काही पर्यटक नाशिकमध्ये परत आलेत. सुदैवाने ते पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यातून बचावलेत. २२ तारखेला ज्या दिवशी दहशतवादी हल्ला त्याच दिवशी हे १८ पर्यटक पहलगाममध्ये असणार होते, मात्र आदल्या दिवशी घाटात दरड कोसळल्यानं रस्ता बंद झाल्यानं त्यांना पहलगाममध्ये पोहचता आलं नाही. त्यामुळे हे सर्व पर्यटक सुदैवाने बचावले. मात्र अगदी जीव मुठीत धरून आणि प्रचंड दहशतीत त्यांना काश्मीरमधील पुढील दिवस काढावे लागले. कुटुंबातील लहान मुले देखील सोबत असल्यानं सर्वजण भयभीत होते.

पहलगाम हल्ल्याच्या विरोधात पुण्यात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक

पुण्यातील गुडलक चौकात हिंदुत्ववादी संघटनांनी केलं आक्रमक आंदोलन

कार्यकर्त्यांनी पाकिस्तानचा व्हिडिओ रस्त्यावर लोळवत आणि तुडवत पाकिस्तानच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

शंखनाद करून हिंदुत्ववादी संघटनांनी केलं जोरदार आंदोलन

पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील २ जणांनी आपला जीव गमावला

नाशिकच्या गोदावरी नदीतील पाणी वापरावर बंदी आणावी, मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल

गोदावरीच्या पाण्याच्या मानवी वापरावर म्हणजेच पिण्यावर आणि स्नानावर बंदी आणण्यासाठी जनहित याचिका

नदीतील पाणी प्रचंड प्रदूषित झाल्याने पाणी वापरण्यावर बंदी आणण्यासाठी केली याचिका दाखल

गोदावरी प्रदूषण मुद्द्यावर लढणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनी केली याचिका दाखल

प्यारे खान, महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षमहाराष्ट्रातील 288 आमदारांपैकी नितेश आणि एकमेव आमदार आहे जे देश तोडण्याची भाषा करतात. दुसरीकडे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी जोडण्याचे काम करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर येत आहेत. पहलगाम येथे मृत्यू झालेल्या जगदाळे आणि गणबोटे यांच्या कुटुंबाची मुख्यमंत्री भेट घेणार आहेत. आज दुपारी विमानतळावर २.३० वाजता येतील. त्यानंतर पहलगाममध्ये मृत्यू झालेल्या जगदाळे आणि गनबोटे यांच्या परिवारास कोंढवा येथे व त्यानंतर कर्वेनगर येथे भेट देतील. त्यानंतर यशदाच्या कार्यक्रमासाठी जातील.

निधीमध्ये गडबड झाली तर जिल्हाधिकाऱ्यांनाही सोडणार नाही

राज्याच्या अर्थ व नियोजन विभागाचा मी मंत्री आहे त्यामुळे 36 जिल्ह्याचे नियोजन यावर्षी मी केले आहे. 21 हजार कोटी रुपयाचा नियोजन 36 जिल्ह्यासाठी केलेला आहे. जिल्हा नियोजन निधीच्या संदर्भामध्ये मला प्रत्येक गोष्ट व्यवस्थित झाली पाहिजे डीपीसीच्या निधीबाबत मला वाईट अनुभव राज्यात आला आहे काही ठिकाणी चुकीच्या प्रकारचे नियोजन केले जात आहे जर यामध्ये कसल्याही चुकीचं आढळून आलं तर मी जिल्हाधिकाऱ्यांना देखील सोडणार नसल्याचं वक्तव्य करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट प्रशासनात जिल्हाधिकाऱ्यांनाच दम दिला आहे.

भिवंडीत गोदामाला भीषण आग

भिवंडी तालुक्यातील रानाळ येथील गोदामाला भीषण आग लागली आहे. गोदामात ठेवलेला प्लायवूड जळून खाक झालाय. आगीचे कारण अस्पष्ट आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

नाशिक जिल्ह्यातील दुष्काळाच्या झळा तीव्र, धरणांमध्ये अवघा ३५ टक्के पाणीसाठा

नाशिक जिल्ह्यातील २४ लहान मोठ्या धरणांमध्ये अवघा ३५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणातील पाणीसाठा ५६ टक्क्यांवर आहे. वाढत्या तापमानामुळे धरणातील त्या पाण्याचंही वेगानं बाष्पीभवन होत आहे. नाशिक जिल्ह्यातील तब्बल सव्वा लाख लोकसंख्येला टँकरने पाणीपुरवठा होत आहे. २०१ गावं आणि वाड्या वस्त्यांवर ६६ टँकरद्वारे पाणीपुरवठा होतोय.

वैद्यकीय अधिकाऱ्यावर ठोठावला २९ लाखाचा दंड....

अवैधरित्या मुरुम खनिजाची विल्हेवाट लावल्याप्रकरणी एका वैद्यकीय अधिकाऱ्याला 29 लाखांचा दंड ठोठावण्यात आला. चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील शेणगाव प्राथमिक आरोग्य केंद्रातील हा प्रकार आहे. कोणताही परवाना व आदेश नसताना संबंधित आरोग्य केंद्रातील अधिकारी सुखदेव करेवाड यांनी मुरुमाची उचल केली. हे मुरुम रुग्णालय परिसरात टाकण्यासाठी आणले. सोबतच बाहेरही विकले. याची माहिती महसूल विभागाला मिळाल्यावर या प्रकरणाची चौकशी झाली असता पंचनाम्यात ४२२ ब्रास मुरूमाचा अवैध साठा रुग्णालय परिसरात आढळून आला. आता या अवैध गौणखनिज उत्खनन प्रकरणी कारवाई करण्यात आली असून महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमानुसार महसूल विभागाने सुखदेव करेवाड या वैद्यकीय अधिकाऱ्यावर २९ लाखाचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे मनमानी करून डोंगर पोखरणे या वैद्यकीय अधिकाऱ्याला चांगलेच महागात पडले.

पुण्यात भारती विद्यापित विश्वविद्यालयाचा ३० वा स्थापना दिन समारंभ सुरुवात

भारती विद्यापीठ शैक्षणिक संकुल, धनकवडी येथे साजरा येथे कार्यक्रम सुरू आहे. या समारंभात ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष व लोकसाहित्याच्या आणि लोकसंस्कृतीच्या ज्येष्ठ अभ्यासक डॉ.तारा भवाळकर यांना भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालय जीवनसाधना गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमास भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम, भारती विद्यापीठाचे कार्यवाह डॉ. विश्वजीत कदम उपस्थितीत

पुण्यातील पोर्शे प्रकरणात अपडेट, शिवानी अगरवाल यांना जामीन मंजूर

पोर्शे अपघातातील आरोपी अल्पवयीन तरुणाचे रक्त बदलल्या प्रकरणी अल्पवयीन तरुणाच्या आईला जामीन

पोर्शे अपघातातील अल्पवयीन तरुणाच्या आईला सुप्रीम कोर्टाने मंजूर केला जामीन

जवळपास १ वर्षाने शिवानी अगरवाल यांना जामीन मंजूर करण्यात आला

येरवडा कारागृहात शिवानी अगरवाल भोगत होत्या शिक्षा

आष्टी तालुक्यातील खडकत येथे जमाव पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार

बीडच्या आष्टी तालुक्यातील खडकत येथे एका चौकामध्ये झेंडा लावण्याचा कारणावरून तुफान दगडफेकीची घटना घडली होती.. आज देखील पुन्हा तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. तर दोन गट आमने-सामने आले होते. आक्रमक झालेला जमाव पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार देखील करावा लागला.. या प्रकरणात बारा जणांच्या विरोधात आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या या ठिकाणची परिस्थिती नियंत्रणात असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.. यासंदर्भात समाजातील नागरिकांनी शांत रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अकोले तालुक्यात शिंदे गटाची ताकद वाढणार

अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेना शिंदे गटाची ताकद आणखी वाढणार आहे.. जिल्ह्यातील आदिवासी ठाकर समाजाचे नेते मारुती मेंगाळ हे आज आपल्या हजारो समर्थकांसह ठाणे येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश करत आहेत.. मेंगाळ यांच्यासोबत अकोले तालुक्यातील अनेक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पंचायतसमिती सदस्य, काही माजी नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिंदे गटात प्रवेश करताय.. आज दुपारी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडणार असून मारुती मेंगाळ हे शेकडो वाहनांचा ताफा घेऊन ठाण्याकडे रवाना झाले आहेत.. मेंगाळ यांच्या शिवसेना प्रवेशाने अकोले तालुक्यासह अहिल्यानगर जिल्ह्यात शिवसेनेला मोठी ताकद मिळणार आहे.

जम्मू काश्मीरमधून ३४३ पर्यटक पुण्यात परत

जम्मू-काश्मीरला गेेलेले ३४३ पर्यटक गेल्या दोन दिवसांत पुण्यात परतले आहेत.उर्वरित पर्यटक येत्या रविवारपर्यंत पुण्यात पोहोचतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जम्मू-काश्मीरमध्ये पुणे आणि जिल्ह्यातून काही पर्यटक स्वतंत्रपणे, तर काही सहल नियोजन करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले होते. त्यांची माहिती मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे. या हेल्पलाइनवर आलेल्या दूरध्वनींनुसार, शहर आणि जिल्ह्यातील एकूण ६५७ पर्यटक गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे. त्यानुसार त्यांच्याशी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

गोबरवाही पोलिसांना मोठी कार्यवाही, 7 लाख 43 हजार 720 रुपयांचा सुगंधित तंबाखू सह मुद्देमाल जप्त

गोबरवाही पोलिसांनी रात्री तुमसर तालुक्यातील पवनारखारीजवळ गस्तीवर असताना वाहनाची तपासणी केली असता त्यात ३० बॅगे मध्ये संबंधित तंबाखू जप्त करत 7 लाख 43 हजार 720 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला.. रहिवासी मोहम्मद अंसारी (वय २८) व वाहीद रियाज अंसारी (वय ३१) यांना करण्यात आली आहे. गोबरवाही पोलिसानी त्यांचा वर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.

परंडा तालुक्यातील ड्रग्स रॅकेटची पाळेमुळे शोधुन काढुन कठोर कारवाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांची भेट घेणार

धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर नंतर परंडा तालुक्यात देखील एमडी ड्रग्सचे मोठे रॅकेट असल्याचा दावा करत त्याची पाळेमुळे शोधुन काढुन कठोर कारवाईच्या मागणीसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे अशी माहिती माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी दिली.परंडा शहरातील १२ पैकी ९ आरोपी बार्शी पोलिसांच्या गळाला लागले आहेत.दरम्यान ठाकुर यांनी पत्रकार परिषद घेतली तर तुळजापूर ड्रग्स प्रकरणातील आरोपीप्रमाणे परंडा येथील ड्रग्स प्रकरणातील आरोपींची बॅंक खाते गोठवावी तसेच या प्रकरणातील मुख्य आरोपी शोधुन अटक करावे अशी मागणी माजी आमदार ठाकूर यांनी केलीय.

भारतीय क्रिकेटपटू राजेश्वरी गायकवाड यांनी घेतले तुळजाभवानी मातेचे दर्शन

भारतीय महिला क्रिकेट संघाच्या फिरकी गोलंदाज राजेश्वरी गायकवाड यांनी सहकुटुंब श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेतले.

राजेश्वरी गायकवाड या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या डावखुऱ्या फिरकी गोलंदाज आहेत.

मूळच्या विजापूरच्या असलेल्या गायकवाडने कर्नाटक महिला संघाकडून क्रिकेट खेळायला सुरुवात केली होती.

गायकवाड कुटुंबीयांनी श्री तुळजाभवानी देवींचे दर्शन घेऊन देवींची आरती व ओटी भरत कुलधर्म कुलाचार केले.

मंदिर संस्थानच्या वतीने श्री तुळजाभवानी देवींची प्रतिमा भेट देऊन गायकवाड यांचा सन्मान करण्यात आला.

जम्मू काश्मीरमधून ३४३ पर्यटक पुण्यात परत

जम्मू-काश्मीरला गेेलेले ३४३ पर्यटक गेल्या दोन दिवसांत पुण्यात परतले आहेत.उर्वरित पर्यटक येत्या रविवारपर्यंत पुण्यात पोहोचतील, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

जम्मू-काश्मीरमध्ये पुणे आणि जिल्ह्यातून काही पर्यटक स्वतंत्रपणे, तर काही सहल नियोजन करणाऱ्या कंपन्यांच्या माध्यमातून पर्यटनासाठी गेले होते. त्यांची माहिती मिळविण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून हेल्पलाइन सेवा सुरू केली आहे.

या हेल्पलाइनवर आलेल्या दूरध्वनींनुसार, शहर आणि जिल्ह्यातील एकूण ६५७ पर्यटक गेल्याची माहिती जिल्हा प्रशासनाला मिळाली आहे.

त्यानुसार त्यांच्याशी आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून संपर्क साधण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.

त्या सात महिलांच्या कुटुंबांना आज प्रत्येकी पाच लाखांची मदत अजित पवारांच्या हस्ते मिळणार

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावात चार एप्रिल रोजी शेतकरी महिला मजुरांचा ट्रॅक्टर विहिरीत कोसळून मृत्यू झाला होता

या घटनेत एकूण दहा जण विहिरीत कोसळले होते

त्यापैकी तिघांना वाचवण्यात यश आलं होतं तर सात महिलांचा मृत्यू झाला होता

या महिलांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मृत्युमुखी पडलेल्या महिलांच्या गुंज गावात येणार आहेत,

मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या माध्यमातून या महिलांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी पाच लाखांचा धनादेश अजित पवारांच्या हस्ते वितरित करण्यात येणार आहे

यासोबतच शासनाच्या विविध योजनांचा देखील थेट लाभ दिल्याचे प्रमाणपत्र उपमुख्यमंत्री पवार हे कुटुंबीयांना देणार आहेत

पुण्यात आरटीओकडून भाडे नाकारणाऱ्या रिक्षाचालकावर कारवाई

१०० रिक्षा चालकांवर केली कारवाई

आरटीओ कडे रिक्षा चालकांच्या विरोधात तक्रारीसाठी दिलेल्या हेल्पलाइनवर अडीचशेच्या वर नागरिकांनी तक्रारी केल्या आहेत यामधील १०० रिक्षाचालकांवर कारवाई करण्यात आली आहे.

गेल्या जून महिन्यात रिक्षा कॅप आणि खाजगी बस यांच्या विरोधातील तक्रारीसाठी एक व्हाट्सअप क्रमांक दिला होता.

त्यावर दखलपात्राच्या 252 तक्रारी आढळल्या यामधील 100 जणांवर कारवाई करत 50 जणाचे दंड ठोठावला तर 50 जणांचे परवाने तात्पुरते रद्द करण्यात आले. तर इतरांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

या तक्रारींमध्ये भाडे नाकारणे गरजेपेक्षा जास्त भाडे घेणे फास्ट मीटर उद्धट वर्तन अशा तक्रारींचे स्वरूप होते होते.

भाजपाचे अध्यक्ष जेपी नड्डा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे कुटुंबाची घेण्याची शक्यता

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील संतोष जगदाळे आणि कौस्तुभ गणबोटे यांची गोळ्या झाडून केली होती होत्या

आज त्यांच्या घरी जाऊन नड्डा आणि फडणवीस सांत्वन करणार असल्याची माहिती

संध्याकाळी दोघे ही एकत्र जाण्याची शक्यता

सकाळी ९ वाजता जे पी नड्डा घेणार श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन

CM Devendra Fadnavis: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर

ग्राम विकास विभाग आणि राज्य पंचायत राज विभाग राज्यस्तरीय कार्यशाळेला राहणार उपस्थित

देवेंद्र फडणवीस करणार मार्गदर्शन

दुपारी चार वाजता यशदा येथे होणार कार्यक्रम

दिवेआगरचे सरपंच सिद्धेश कोसबे यांना ठार मारण्याची धमकी

० अतिक्रमणाची नोटीस पाठवल्याच्या रागातून धमकी

० सिद्धेश कोसबे यांची पोलीसात तक्रार

० गुन्हा दाखल करून घेण्यास पोलीसांची टाळाटाळ

० आमचा पण संतोष देशमुख व्हायची वाट पाहताय का

० सरपंच सिद्धेश कोसबे यांचा सवाल

Amravati: अमरावतीच्या मेळघाटमधील ढाकणा वनपरिक्षेत्रात मोठी आग

आग लागल्यामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलातील झाडे जळून खाक..

वनविभाग व स्थानिक आदिवासींच्या मदतीने विजवली गेली आहे..

जंगलाला आग कशी लागली ही अद्यापही अस्पष्टच..

उन्हाळ्यात मेळघाटात अनेक जंगलांना आग लागत असल्याच्या घटना घडत असतात.

Hingoli: हिंगोलीत मुस्लिम समाजाने रात्री काढला कँडल मार्च

जम्मू काश्मीरमधील पहेलगाम येथील दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ हिंगोलीमध्ये पाकिस्तान विरोधात मुस्लिम समाज एकवटल्याचं पाहायला मिळालं

मुस्लिम समाजाच्यावतीने हिंगोली शहरात कँडल मार्चचे आयोजन करण्यात आले होते

यावेळी गांधी चौक परिसरात शेकडोच्या संख्येने मुस्लिम बांधवांनी कॅण्डल पेटवत पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे

यावेळी केंद्र सरकारने दहशतवाद्यांना धडा शिकवावा अशी मागणी देखील मुस्लिम बांधवांनी सरकारकडे केली होती

Ratnagiri: पहलगाम आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत जनआक्रोश मोर्चा

काश्मीरच्या पहलगाम येथे दहशतवाद्यांंनी पर्यटकांंवर केलेल्या भ्याड आतंकवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रत्नागिरीत सकल हिंदू समाजाकडून भव्य हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.

रत्नागिरी शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक, लक्ष्मी चौक गाडीतळ येथून या निषेध मोर्चाला सुरुवात झाली.

शहरातल्या बाजारपेठेतून हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत आला. यावेळी पाकिस्तान विरोधात जोरदार घोषणा देण्यात आल्या.

तसेच यावेळी पाकिस्तानचा झेंडा जाळण्यात आला..

यावेळी हिंदुत्ववादी कार्यकर्त्या हर्षा ठाकूर यांनी मार्गदर्शन केलं. यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आलं.

SSC - HSC Result: दहावी - बारावी परीक्षेचा निकाल मे महिन्यात जाहीर होणार

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळतर्फे घेण्यात आलेल्या दहावी - बारावीच्या 21 लाख विद्यार्थ्यांचा निकाल होणार जाहीर

मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बारावीचा, तर दुसर्या आठवड्यात दहावीचा निकाल जाहीर

याबाबत लवकरच तारीख जाहीर केल्या जातील असेही बोर्डाकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची माहिती

Pune Unseasonal Rain: पुणेकरांना उन्हापासून दिलासा मिळणार, आज वादळी वाऱ्यासह पावसाचा अलर्ट

पुणे वेधशाळेची माहिती

पुणे शहरासह सोलापूर आणि मराठवाड्यातील काही भागात आज पावसाची शक्यता

तर राज्यातील अनेक जिल्ह्यांना हवामान खात्याकडून आज आणि उद्या येलो अलर्ट

पुणे शहरासह जिल्ह्यात देखील आज दिवसभरात पावसाची शक्यता

Buldhana: बुलढाण्यात मुस्लिम बांधवांनी जाळले पाकिस्तान मुर्दाबादचे पोस्टर

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या भ्याड हल्ल्याचा निषेध करत बुलढाण्यात मुस्लिम बांधवांनी जोरदार निदर्शने केली आहेत,

यादरम्यान पाकिस्तान मुर्दाबाद आणि हिंदुस्तान जिंदाबाद च्या घोषणा देण्यात आल्या, सोबतच पाकिस्तानच्या लष्कर प्रमुखाच्या पोस्टर जाळण्यात आले, यावेळी मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव उपस्थित होते...

Jalna: जालन्यात प्रशासनाचा वाळूमाफियांना दणका, आपेगाव येथील गोदावरी नदी पात्रात महसूल प्रशासनाची मोठी कारवाई

जालन्यातील अंबड तालुक्यातील आपेगाव येथील गोदावरी नदीपात्रात अंबड तहसीलदारांनी मोठी कारवाई केली आहे.

या कारवाईत अवैध वाळू उपसा करणाऱ्या सहा हायवा 3 कोटी 36 लाख रुपयांचा मुद्देमाल तहसीलदारांनी जप्त केलाय.

आपेगाव येथील गोदावरी नदी पात्रात तहसीलदारांनी रात्री तीन वाजेच्या सुमारास ही मोठी कारवाई केली आहे.

या कारवाईमुळे अंबड तालुक्यातील वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत.

दरम्यान कारवाईत जप्त केलेल्या हायवा सध्या अंबड तहसील कार्यालयात आणण्याची काम सुरू आहे.

Pandharpur News: पहलगाम येथील हल्याचा पंढरपुरातील मुस्लिम समाजाकडून निषेध

पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्याचा पंढरपुरातील मुस्लिम समजाने निषेध केला.

दहशतवादी हल्यात मरण पावलेल्या पर्यटकांच्या आत्म्याला शांती मिळावीयासाठी काल शुक्रवारच्या नमाज पठणानंतर सामुहीक रित्या प्रार्थना करून भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.

यावेळी समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जम्मू - काश्मीरला गेलेले 31 पर्यटक आज परतणार अकोल्यात, तर 6 पर्यटक अजूनही अडकून

जम्मू आणि काश्मीरला गेलेले 31 पर्यटक आज अकोला जिल्ह्यात परतणार आहेये..

हे 31 पर्यटक कालं शुक्रवारी सुखरुप मुंबईत पोहोचले.. अन् ते आज शनिवारी अकोल्यात पोचणार आहेत. खाजगी ट्रॅव्हल्सने मुंबई येथून ते अकोल्याकडे निघाले आहेत..

सकाळी 11 वाजेपर्यंत ते अकोल्यात दाखल होणार आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगामच्या बैसरन व्हॅलीमध्ये दहशतवाद्यांनी पर्यटकांवर हल्ला केल्यानंतर जिल्ह्यातही अनेकांना काळजी लागली होती.

जठारपेठ येथील एका टूर्स अँड ट्रॅव्हल्सने काश्मीर येथे यात्रा आयोजित केली होती. त्यानुसार अकोला, बुलडाणा व पुणे येथील 31 प्रवाशांना रेल्वेने घेऊन काश्मीर येथे पोहोचले होते. आता त्यांचा परतीचा प्रवास सुरू झाला आहे.

दरम्यान हे पर्यटक श्रीनगरमधील डल नेक जवळ असलेल्या हॉटेलमध्ये मुक्कामी होते.

दरम्यान, सुरुवातीला 31 पर्यटक अडकून होते, त्यांना सुखरूप आणल्यानंतर आता कालं शुक्रवारी आणखी 6 अकोलेकर नागरिक काश्मिरमध्ये अडकल्याचे समोर आले.

त्यामुळे तातडीने ही माहिती मंत्रालयात पाठवण्यात आली. त्यांना देखील परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहे.

Jalna Unseasonal Rain: जालना जिल्ह्यात दोन दिवस येलो अलर्ट जारी, विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता

जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह पावसाची शक्यता देखील वर्तवली आहे.

कुलाबा प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने जालना जिल्ह्यात पुढील दोन दिवस येलो अलर्ट जारी केला आहे.

या काळात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडासह ताशी 30 ते 40 किलोमीटर प्रतितास वेगाने वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

या नैसर्गिक आपत्तीसंदर्भात सर्व संबंधित यंत्रणा सतर्क असल्याचं जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आलय.

दरम्यान प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने जालना जिल्ह्यात दोन दिवस येलो अलर्ट जरी केल्याने या काळात नागरिकांनी काळजी घ्यावी अस आवाहन जालन्याचे निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक यांनी केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.