ऑलराउंडर कृणाल पंड्या आणि विराट कोहली या दोघांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्सचा त्यांच्याच घरच्या मैदानात 6 विकेट्सने धुव्वा उडवला आहे. दिल्लीने आरसीबीला विजयासाठी 163 धावांचं आव्हान दिलं होतं. आरसीबीने हे आव्हान 4 विकेट्स गमावून आणि 21 बॉलआधी पूर्ण केलं. आरसीबीने 165 धावा केल्या. आरसीबीने यासह दिल्लीचा हिशोबही क्लिअर केला आणि पराभवाची परतफेड केली. दिल्लीने आरसीबीला 24 मार्च रोजी 6 विकेट्सने पराभूत केलं होतं. आता आरसीबीने दिल्लीला जशास तसं उत्तर दिलं. आरसीबीचा हा या मोसमातील एकूण सातवा विजय ठरला. तर दिल्लीचा हा तिसरा पराभव ठरला.