महाराष्ट्र पोलिसांवर अक्षेपार्ह विधान केल्यानंतर मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी आमदार संजय गायकवाड यांच्यावर संतापलं होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी त्यांना कडक शब्दात समज द्यावी, अशी तंबी दिल्यानंतर आमदार संजय गायकवाडच्याविरुद्धात गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या आभार मेळाव्या आधीच ही कारवाई करण्यात आलीय.
बुलढाण्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. BNS 296, 352 व पोलीस अधिनियम 1922 चे कलम 3 (पोलिसांबद्दल अप्रितीची भावना चेतविने ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. विशेष म्हणजे उद्या यांचा बुलढाणा येथे कार्यकर्ता आभार मेळावा होत आहे, त्याच्या पूर्वसंध्येला आमदार संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे.
पुण्यात माध्यम प्रतिनिधींशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना तंबी दिली होती. वारंवार असं बोलणं खपवून घेतलं जाणार नाही. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार गायकवाड यांना कडक शब्दात समज द्यावी असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले होते. त्यानंतर आज संध्याकाळी आमदार गायकवाड यांच्याविरुद्ध बुलढाणा जिल्ह्यातील पोलीस स्टेशमध्ये तक्रार करण्यात आलीय.
एका पत्रकार परिषदेत बोलताना संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसात भ्रष्ट्राचार असल्याचा आरोप केला होता. ‘महाराष्ट्र पोलिसांसारखं अकार्यक्षम खातं जगात नाहीये. आमदार अर्जुन खोतकर आणि संजय गायकवाड यांच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी आली होती. त्याप्रकरणी बोलताना माध्यम प्रतिनिधींशी बोलताना गायकवाड यांनी पोलीस खात्यावर भ्रष्ट्राचाराचा आरोप केला होता.