डोंबिवली - अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. डोंबिवली मधील जोशी, लेले आणि मोने हे नातेवाईकच होते. तिन्ही कुटुंब गेले होते काश्मीरला. त्यांच्यासमोर घडलेला सगळा घटनाक्रम त्यांच्या तोंडून ऐकल्यानंतर अंगावर शहारे आले. त्यांच्यासमोरच त्यांच्या घरातले तिन्ही कर्ते पुरुष त्याने गमावले ही मोठी दुःखद घटना आहे अशी भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डोंबिवली येथे व्यक्त केली.
जम्मू काश्मीर येथील पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या हेमंत जोशी, अतुल मोने, संजय लेले यांच्या कुटुंबीयांची रविवारी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे साहेब यांनी सांत्वनपर भेट घेतली.
हेमंत जोशी माझं भाषण बघायचे, हे त्यांच्या परिवाराने मला सांगितलं. ते मला फॉलो करायचे. माझ्याबद्दल त्यांना फार आपुलकी होती. त्यामुळे ते आमच्या परिवारातले आहेत. त्यांना भविष्यात पुढच्या ज्या काही अडचणी आहेत त्या सोडवण्यास शिवसेना त्यांच्या पाठीशी असेल.
विरोधक टीका करत असल्याच्या प्रश्नाचा उत्तर देताना शिंदे म्हणाले, कुणी कशावर टीका करावी, हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे.