Mumbai Indians vs Lucknow Super Giants Marathi Update: इंडियन प्रीमिअर लीग २०२५ मध्ये जसप्रीत बुमराहने () मुंबई इंडियन्ससाठी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. जसप्रीतच्या भेदक माऱ्यामुळे लखनौ सुपर जायंट्सची १६ षटकांत अवस्था ८ बाद १४२ अशी झाली आहे. बुमराहने आजच्या सामन्यात पहिली विकेट घेऊन लसिथ मलिंगाचा () मोठा विक्रम मोडला.
सध्या चालू असलेल्या आयपीएल हंगामात बुमराहने आपल्या अचूक गोलंदाजीने पुन्हा एकदा सर्वांना भुरळ घातली आहे. बुमराहने लसिथ मलिंगाचा दीर्घकाळचा विक्रम मोडला. बुमराहने आयपीएल २०२५ मध्ये लखनौ सुपर जायंट्सविरुद्धच्या सामन्यात मलिंगाच्या १७० विकेट्सच्या विक्रमाला मागे टाकले. त्याने १७१ विकेट्स घेत मुंबई इंडियन्ससाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनण्याचा मान मिळवला. या सामन्यात त्याने ३ षटकांत १५ धावा देत ४ विकेट्स घेतल्या.
त्याच्या या ऐतिहासिक कामगिरीनंतर वानखेडे स्टेडियमवर उपस्थित प्रेक्षकांनी तसेच मुंबई इंडियन्सचे मालक आकाश अंबानी आणि नीता अंबानी यांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्याचे अभिनंदन केले. बुमराहने केवळ १४१ सामन्यांत हा विक्रम मोडला, तर मलिंगाने १३७ सामन्यांत १७० विकेट्स घेतल्या होत्या. बुमराहची सरासरी २२.५४ आणि इकॉनॉमी रेट ७.३१ आहे.
मुंबईकडून सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाजजसप्रीत बुमराह - १७४*
लसिथ मलिंगा - १७०
हरभजन सिंग - १२७
मिचेल मॅक्लेघन - ७१
किरॉन पोलार्ड - ६९
लसिथ मलिंगा - ६३
जसप्रीत बुमराह - ४१
भुवनेश्वर कुमार - ४०
मोहम्मद शमी - ३०
संदीप शर्मा - २८
आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा एका डावात ३ किंवा अधिक बळी घेणारे खेळाडू:
जसप्रीत बुमराह - २४
युझवेंद्र चहल - २१
लसिथ मलिंगा - १९
रवींद्र जडेजा - १७
हर्षल पटेल - १७
अमित मिश्रा - १७