इंडियन प्रीमियर लीग २०२५ स्पर्धेत रविवारी (२७ एप्रिल) दोन सामने होत आहेत. दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात खेळवण्यात येत आहेत. हा सामना दिल्लीच्या घरच्या मैदानात अरुण जेटली स्टेडियमवर खेळवला जात आहे.
या सामन्यात बंगळुरूचा कर्णधार रजत पाटिदारने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यात महत्त्वाचा बदल केला आहे. सध्या फॉर्ममध्ये असलेल्या फिल सॉल्टला त्यांनी बाहेर केले असून जेकॉब बेथलला संधी दिली आहे. सॉल्टला ताप असल्याने तो हा सामना खेळणार नसल्याचे पाटिदारने स्पष्ट केले. तसेच दिल्ली संघातही बदल झाला असून उपकर्णधार फाफ डू प्लेसिसचे संघात पुनरागमन झाले आहे.
या सामन्यात विराट कोहलीवरही लक्ष्य असणार आहे. जरी विराट बंगळुरूकडून खेळत असला तरी दिल्लीचं हे मैदान त्याचं घरचं मैदान आहे.
याशिवाय जेव्हा १० एप्रिलला बंगळुरूमध्ये हे दोन संघ आमने-सामने आले होते. त्यावेळी दिल्लीला सामना जिंकवून दिल्यानंतर केएल राहुलने केलेलं कांतारा सेलिब्रेशनही सर्वांच्या लक्षात असेल. त्यानंतर आता हा सामना लक्षवेधी ठरणार आहे. बंगळुरू त्या पराभवाची परतफेड करणार की आपल्या घरच्या मैदानात वर्चस्व गाजवणार हे पाहाणे औत्सुक्याचे ठरेल.
प्लेइंग इलेव्हन -दिल्ली कॅपिटल्स: फाफ डू प्लेसिस, अभिषेक पोरेल, करुण नायर, केएल राहुल (यष्टीरक्षक), अक्षर पटेल (कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, विपराज निगम, मिचेल स्टार्क, दुष्मंथा चमीरा, कुलदीप यादव, मुकेश कुमार
रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू: विराट कोहली, जेकब बेथेल, रजत पाटीदार (कर्णधार), जितेश शर्मा (यष्टीरक्षक), टीम डेव्हिड, कृणाल पंड्या, रोमॅरियो शेफर्ड, भुवनेश्वर कुमार, सुयश शर्मा, जोश हेजलवुड, यश दयाल
इम्पॅक्ट सब्स्टिट्युटसाठी पर्यायदिल्ली कॅपिटल्सचे इम्पॅक्ट सब्स्टिट्युटसाठी पर्याय - आशुतोष शर्मा, मोहित शर्मा, जॅक फ्रेझर मॅकगर्क, माधव तिवारी, त्रिपुर्ण विजय
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे इम्पॅक्ट सब्स्टिट्युटसाठी पर्याय - देवदत्त पडिक्कल, लियाम लिव्हिंगस्टोन, रसिक दार सलाम, मनोज भंडागे, स्वप्नील सिंग
हा सामना दिल्लीचा ९ वा, तर बंगळुरूचा १० वा सामना आहे. दिल्लीने ८ पैकी ६ सामने जिंकले असून त्यांचे १२ गुण आहेत. बंगळुरूनेही ९ पैकी ६ सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांचेही १२ गुण आहेत. अशात आता दोन्ही संघ हा सामना जिंकून १४ गुण मिळवून प्लेऑफचं तिकीट जवळपास निश्चित करण्यासाठी उत्सुक असतील.
आमने-सामनेपंजाब किंग्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स संघात आत्तापर्यंत ३२ सामने खेळवण्यात आले आहेत. यातील १९ सामने बंगळुरूने आणि १२ सामने दिल्ली कॅपिटल्सने जिंकले आहेत. एका सामन्याचा निकाल लागलेला नाही.