Bhandara : भीषण अपघात! भरधाव बोलोरो ट्रकवर आदळला; चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू; तर एक जण जखमी
Marathi April 28, 2025 10:26 AM

भंडारा अपघात बातम्या: मुंबई – कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात (Accident News) चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झालाय. तर, एक जण गंभीर जखमी झालाय. हा भीषण अपघात(Accident) मुंबई – कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा (Bhandara News)शहराजवळील बेला इथं(27 एप्रिलच्या) रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडलाय. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून पुढील कारवाईही करण्यात आली आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू, चालक गंभीर जखमी

पुढे आलेल्या माहिती नुसार, रायपूरकडून आलेलं बोलेरो  वाहन हे नागपूरकडं जात होते. यात 5 जण प्रवास करीत होते. बेला गावाजवळ असलेल्या हॉटेल साई प्रसादमध्ये हे सर्व जेवण करण्यासाठी महामार्गावरून वळत असताना नागपूरकडून भरधाव आलेल्या ट्रकवर आदळले. यात चौघांचा मृत्यू झाला. तर, चालक गंभीर जखमी आहे. घटनेनंतर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबली. घटनेची माहिती मिळतात भंडारा पोलीस आणि गडेगाव महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्तांना तातडीनं जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविलं. तर, अपघातग्रस्त वाहनांना महामार्गावरून हटवून वाहतूक पूर्ववत सुरू केली.

अपघातातील मृतकांचे नावं

1) श्रेंद्रा बागेल
२) शैलेश गोकूपुर
3) विनोद बिनवार
4) अशोक धैरवाल
जखमी
1) अविनाश नंगाटोड (ड्रायव्हर)

इतर महत्वाच्या बातम्या

अधिक पाहा..

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.