पश्चिम विदर्भात 385 गावांमध्ये पाणी टंचाई निर्माण झाले आहे. त्यामुळे 67 टँकर आणि 883 विहिरींचे अधिग्रहण करून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. पश्चिम विदर्भातील 29,679 हातपंपापैकी 1026 हातपंप बंद आहे.
Solapur Live: सोलापूर कृउबासाठी आज मतमोजणीसोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीची मतमोजणी आज होणार आहे. भाजप आमदार सुभाष देशमुख आणि भाजप आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्यापैकी कोण बाजी मारणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. एकूण 18 जागांसाठी रविवारी मतदान झाले होते.
Thane Traffic Live: ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडीआठवड्याच्या पहिल्याच दिवशी ठाणे ते मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या पूर्व द्रुतगती मार्गावर वाहतूक कोंडी झाली आहे. टोलनाका आणि सिग्नल यंत्रणेमुळे वाहतूक कोंडी झाल्याचं पहायला मिळतंय. दोन ते तीन किलोमीटरपर्यंत संथ गतीने वाहने चालत आहेत.
Jammu Kashmir Live: २६ वर्षांनंतर काश्मीरमध्ये तीव्र संताप- ओमर अब्दुल्ला२६ वर्षांनंतर काश्मीरमध्ये तीव्र संताप उसळला आहे, दहशतवादाविरोधात काश्मीर रस्त्यावर उतरलं आहे, अशी भूमिका मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी व्यक्त केली.
कामकाजाची गतिमानता वाढवण्यासाठी सहकार दरबार- मंत्री आबिटकरसहकार विभागातील कामकाजाची गतिमानता वाढावी आणि सर्व सामान्यांच्या कामाला गतिमानता मिळावी अडचणी दूर व्हाव्यात आणि अधिकारी चुकत असेल तर कारवाई करता यावी यासाठी सहकार दरबार आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती मंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली.
Pune Live: पुणे विमानतळावर आजपासून १० रुपयांत चहा, २० रुपयांत कॉफीपुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर आजपासून १० रुपयांत चहा, २० रुपयांत कॉफी उपलब्ध होणार आहे. हवाई प्रवास करताना योग्य दरात आणि गुणवत्तापूर्ण अन्नपदार्थ उपलब्ध व्हावेत, या उद्देशाने पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावर 'उडान कॅफे' या उपहारगृह सुरू आहे. या कॅफेमधून विमान प्रवाशांना विमानतळावर स्वस्तात आणि दर्जेदार अन्नपदार्थ उपलब्ध होणार आहेत.
Pahalgam terror attack live: पाकिस्तानी लष्करामध्ये राजीनामासत्र सुरुभारताने युद्धसराव सुरु केल्यानंतर पाकिस्तानी लष्करामध्ये राजीनामा सत्र सुरु झाल्याची माहिती आहे. बाराशेंहून अधिक सैनिकांनी राजीनामा दिल्याची सूत्रांची माहिती आहे.
Mumbai Live: भाजपचे महाराष्ट्रात १२३५ संघटन मंडळे- चव्हाणभाजप कार्याध्यक्ष रवींद्र चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्रात एक जानेवारीपासून संघटन पर्व सुरू झाल आहे. संघटनात्मक विषय हाताळण्यात येताय. जिल्हाचे गठनच्या दृष्टीने आम्ही चाललो आहे. काही जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्व प्रक्रिया पूर्णत्वास नेत आहे. जिल्हा संरचनेतील बदलाबाबत पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेत असतो. छोटी मंडळ असावी याबाबतचा निर्णय केंद्रीय नेतृत्वाने घेतला. 1235 मंडळाचे गठन महाराष्ट्रात झाले आहे.
सिंहगड रोड राजाराम ब्रिज ते वडगाव ब्रिज ट्राफिक जामसिंहगड रोड राजाराम ब्रिज ते वडगाव ब्रिज ट्राफिक जाम
सिंहगड रस्त्यावर उड्डाणपुलाचे काम झालं असतानाही वाहतुकीसाठी उड्डाणपूल सुरू करण्यात आलेला नाही.
मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी
जम्मू-काश्मिर विधान सभेचं विशेष अधिवेशन सुरूजम्मू-काश्मिर विधान सभेचं विशेष अधिवेशन सुरू
भारतात लग्न करून राहतायेत पाच लाखांपेक्षा अधिक पाक महिला- दुबेभारतात लग्न करून राहतायतेह पाक महिला भाजप खासदार दुबे यांनी टिका क
देवेंद्र फडणवीस व जे.पी. नड्डा यांनी छत्रपती संभाजीनगर येथे राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीत ट्रू - बीम युनिटची केली पाहणीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा यांनी छत्रपती संभाजीनगर येथे राज्य कर्करोग संस्थेच्या विस्तारीत ट्रू - बीम युनिटची पाहणी केली. यावेळी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, खा. डॉ. भागवत कराड व इतर मान्यवर उपस्थित होते.
Delhi Live : भारत सरकारने १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घातलीगृह मंत्रालयाच्या शिफारशींनुसार, भारत सरकारने जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी घटनेच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्य आणि सुरक्षा संस्थांविरुद्ध प्रक्षोभक आणि सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील सामग्री, खोटे आणि दिशाभूल करणारे कथन आणि चुकीची माहिती प्रसारित केल्याबद्दल डॉन न्यूज, समा टीव्ही, आर्य न्यूज, जिओ न्यूजसह १६ पाकिस्तानी युट्यूब चॅनेलवर बंदी घातली आहे
Walmik karad Live : वाल्मिक कराडची रुग्णालयातून कारागृहात रवानगीवाल्मीक कराडला छातीत दुखू लागल्याने बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते, आता प्रकृती स्थिल झाल्यानंतर कराची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
Delhi Live : संरक्षणमंत्री राजनाथ सिंह पंतप्रधान मोदींची घेणार भेटसंरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत, पहलगाम हल्ल्याला एक आठवडा पूर्ण झाल्यानंतर ही भेट महत्वाची मानली जात आहे.
Mumbai Live : बेस्टचा प्रवास दुपटीने महागणारसर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा बेस्टचा प्रवास महागणार आहे. बेस्टचा प्रवास दुप्पट होणार आहे. भाडेवाढीला मुंबई महानगर पालिकेने मंजुरी दिली आहे.
Pune Live : विदर्भाला मागे टाकत पुण्यात सर्वाधिक तापमानाची नोंदकाल राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद पुणे शहरात झाली असून शहरातील लोहगाव परिसरात ४२.८ अंश तापमानाची नोंद इतकी नोंद झाली आहे. पुण्याने विदर्भालाही मागे टाकले आहे.
J&K Live : पाकिस्तानी सैन्याकडून एलओसीवर तिसऱ्या दिवशीही गोळीबार, भारताचे चोख प्रत्युत्तर२७-२८ एप्रिल २०२५ च्या रात्री, कुपवाडा आणि पूंछ जिल्ह्यांसमोरील नियंत्रण रेषेवर पाकिस्तानी लष्कराच्या चौक्यावरुन गोळीबार करण्यात आला. भारतीय सैन्याने जलद आणि प्रभावीपणे प्रत्युत्तर दिल्याची माहिती भारतीय सेनेकडून देण्यात आली आहे.
JNU Election Result : जेएनयू विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीत डाव्यांचे वर्चस्व; एका जागेवर फडकला भगवाजवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थी संघटनांच्या निवडणुका रात्री उशिरा संपल्या. या निकालांत ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन आणि डेमोक्रॅटिक स्टुडंट्स फ्रंट (AISA-DSF) यांच्या डाव्या आघाडीने ४ पैकी ३ केंद्रीय पॅनल जिंकले. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने (एबीव्हीपी) एक जागा जिंकली आहे.
Palghar Earthquake : पालघरच्या डहाणू तलासरी भागात भूकंपाचे धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरणपालघरमध्ये भूकंपाचे धक्के बसल्याची घटना घडली. डहाणू तलासरी भागात संध्याकाळी 7 वाजून 23 मिनिटांच्या सुमारास भूकंपाचे धक्के बसले. भूकंपाच्या धक्क्याने डहाणू तलासरी हादरले आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Bhandara Accident : मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात; चौघांचा मृत्यू, एक जण गंभीर जखमीमुंबई-कोलकाता महामार्गावर भीषण अपघाताची घटना घडलीये. यात बोलोरो आणि ट्रकमध्ये झालेल्या भीषण अपघातात चौघांचा घटनास्थळीचं मृत्यू झाला आहे. तर, एक जण गंभीर जखमी आहे. हा भीषण अपघात मुंबई-कोलकाता राष्ट्रीय महामार्गावरील भंडारा शहराजवळील बेला इथं 27 एप्रिलच्या रात्री 10.30 वाजताच्या सुमारास घडला आहे.
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यावर चिथावणीखोर वक्तव्य; युट्यूबर नेहा सिंग राठोडवर देशद्रोहाचा गुन्हा दाखललखनौ : पहलगाम हल्ल्यावर चिथावणीखोर वक्तव्य केल्याबद्दल चर्चेत आलेल्या युट्यूबर नेहा सिंग राठोडविरुद्ध रविवारी हजरतगंज पोलिस ठाण्यात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला.
Kolhapur Water Shortage : निम्म्या कोल्हापूर शहरात पाण्याचा ठणठणाटकोल्हापूर : थेट पाईपलाईन योजनेच्या पाणी उपसा पंपांसाठी असलेल्या व्हीडीएफ यंत्रणेत बिघाड झाल्याने तीन दिवसांपासून निम्म्या शहरात पाण्याचा ठणठणाट जाणवत आहे. त्यातच महापालिकेकडे असणारे मोजके टॅंकरची काही माजी नगरसेवकांकडून पळवापळवी सुरू असल्याने अनेक भागांतील नागरिक पाण्यापासून वंचित राहिले.
Nipani Bandh : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ निपाणीत कडकडीत बंदनिपाणी : पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ रविवारी (ता. २७) येथील विविध व्यापारी असोसिएशनसह संघटनांनी शहर बंदची हाक दिली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत शहरात आज कडकडीत बंद पाळून व्यापारी, व्यावसायिकांसह नागरिकांनी दहशतवाद्यांचा निषेध केला. बंदमुळे दिवसभर शहरातील बाजारपेठेसह प्रमुख मार्ग ओस पडल्याने संपूर्ण शहर शोकमग्न झाल्याचे दिसून आले.
Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे आजऱ्यात आज लोकार्पणआजरा : छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा सोमवारी (ता. २८) होत आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण होईल. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. यानिमित्त आजरा शहरात विविध ऐतिहासिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम सुरू; दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचे सत्रLatest Marathi Live Updates 28 April 2025 : पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना आणि त्यांच्या कारवायांना नेस्तनाबूत करण्यासाठी केंद्र सरकार विविध पातळ्यांवर सक्रिय झाले असून, दिल्लीत उच्चस्तरीय बैठकांचे सत्र चालूच आहे, तर काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोधमोहीमही सुरू असून, त्यांच्या घरांना जमीनदोस्त करण्याची कारवाईही स्थानिक प्रशासनाने हाती घेतली आहे. तसेच कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यांत दरवर्षी येणाऱ्या पुराचे पाणी मराठवाड्याकडे वळविण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. दक्षिण मुंबईतील बॅलार्ड इस्टेट भागातील सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) कार्यालयात रविवारी पहाटेच्या सुमारास लागलेली भीषण आग दहा तासांनंतर आटोक्यात आणण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचा लोकार्पण सोहळा आजऱ्यात आज होत आहे. सार्वजनिक आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते पुतळ्याचे लोकार्पण होईल. तर, वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आहेत. त्याचबरोबर राज्यातील वातावरणात बदल पहायला मिळत आहे. यासह देश आणि राज्यातील महत्त्वाच्या घडामोडी तसेच वाहतूक कोंडी, राजकीय घडामोडी, क्रीडा, मनोरंजन, मान्सून या सर्व घडामोडींचे अपडेट जाणून घ्या एका क्लिकवर..