आयपीएल 2025 मध्ये रविवारी 27 एप्रिलला डबल हेडरचा थरार रंगला आहे. डबल हेडरमधील पहिल्या सामन्यात वानखेडे स्टेडिममध्ये मुंबई इंडियन्सने लखनौ सुपर जायंट्सवर मात करत पराभवाची परतफेड केली आणि हिशोब बरोबर केला. तर दुसऱ्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने दिल्ली कॅपिट्ल्सचा धुव्वा उडवला. सूर्यकुमार यादव याने मुंबईला विजयी करण्यात निर्णायक भूमिका बजावली. सूर्याने लखनौ विरूद्धच्या सामन्यातील पहिल्या डावात सूर्याने अर्धशतकी खेळी केली. सूर्याने यासह ऑरेंज कॅप पटकावली. सूर्याची ऑरेंज कॅप मिळवण्याची ही पहिलीच वेळ ठरली. त्यामुळे सूर्या प्रचंड आनंदी होता. मात्र सूर्याच्या या आनंदावर काही तासांतच विरजण पडलं.
सूर्याने आयपीएल 2025 मधील 45 व्या सामन्यात लखनौ विरुद्ध 28 बॉलमध्ये 45 रन्स केल्या. सूर्यकुमार यादव याने यासह आयपीएलमध्ये 4 हजार धावा पूर्ण केल्या. सूर्या वेगवान 4 हजार धावा करणारा पहिला भारतीय ठरला. सूर्याने यासह ऑरेंज कॅपही मिळवली. सूर्या इतक्या वर्षात पहिल्यांदा ऑरेंज कॅप मिळवण्यात यशस्वी ठरला. मात्र सूर्या 2-3 तासांपेक्षा फार वेळ ऑरेंज कॅप आपल्याकडे ठेवण्यात अपयशी ठरला. आरसीबीच्या विराट कोहली याने दिल्ली विरुद्ध विजयी धावांचा पाठलाग करताना अर्धशतकी खेळी केली. विराटच्या खेळीमुळे आरसीबीचा विजय सोपा झाला. विराटने या अर्धशतकासह सूर्याकडे असलेली मानाची ऑरेंज कॅप मिळवली.
सूर्याने लखनौ विरुद्ध केलेल्या खेळीमुळे त्याच्या नावावर या 18 व्या मोसमात एकूण 427 धावा झाल्या. सूर्या यासह ऑरेंज कॅपचा मानकरी ठरला. मात्र पुढच्याच दिल्ली विरुद्ध आरसीबी सामन्यानंतर ऑरेंज कॅपने डोकं बदललं. विराटने दिल्ली विरुद्ध 47 चेंडूत 51 धावांची खेळी केली. विराटच्या नावावर यासह 18 व्या मोसमात एकूण 447 धावा झाल्या. विराटच्या खात्यात सूर्याच्या तुलतने 16 धावा अधिक झाल्या. विराट अशापक्रारे ऑरेंज कॅप मिळवण्यात यशस्वी ठरला.
दरम्यान ऑरेंज कॅपच्या शर्यतीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव या दोघांव्यतिरिक्त टॉप 5 मध्ये गुजरात टायटन्सचा साई सुदर्शन तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर चौथ्या आणि पाचव्या स्थानी लखनौ सुपर जायंट्सचे फलंदाज आहेत. निकोलस पूरन चौथ्या आणि मिचेल मार्श पाचव्या स्थानी आहे.