कॅनडामधील प्रसिद्ध नेता आणि खलिस्तान समर्थक जगमीत सिंग याला जोरदार धक्का बसला आहे. कॅनडाच्या सार्वत्रिक निवडणुकीत जगमीत सिंग याच्या एनडीपी पक्षाचा दणदणीत पराभव झाला. स्वत: जगमीत सिंग याला पराभव पत्करावा लागला आहे. पराभवानंतर जगमीत सिंग याने राजीनामा दिला आहे. एनडीपी पक्षाला केवळ सात जागा मिळाल्या आहेत. मागील निवडणुकीत या पक्षाला २५ जागा मिळाल्या होत्या.
निकालानंतर बोलताना भावूक झालेल्या जगमीत सिंग म्हणाला, मी खलिस्तानी चळवळीला कमकुवत पडू दिले नाही. परंतु जनतेने त्याचा स्वीकार केला नाही. मी निराश झाला आहे, परंतु पराभव मान्य केला नाही. यापुढेही मी प्रयत्न करत राहणार आहे. मी राजीनामा देत आहे.
जगमीत सिंग भारतीय वंशाचा कॅनडाचा नागरिक आहे. त्याचा जन्म पंजाबमधील बरनाला जिल्ह्यातील ठीकरिवाल गावात झाला. त्याचा परिवार 1970 च्या दशकात कॅनडामध्ये शिफ्ट झाला. जगमीत सिंग नेहमी भारत विरोधी भूमिका घेत असतो.
शिख समाजातील असलेल्या जगमीत याचा समावेश कॅनडातील मोठा राजकीय नेत्यामध्ये होतो. राजकारणात येण्यापूर्वी तो वकिली व्यवसाय करत होता. त्याचवेळी त्याने खलिस्तान चळवळ कॅनडात सक्रीय केली. भारतात जगमीत याच्यावर बंदी आहे. कॅनडामध्ये 2021 मध्ये झालेल्या निवडणुकीत जगमीतच्या पार्टीला 25 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी जगमीतची पार्टी सरकारमध्ये किंगमेकर ठरली होती.
कॅनडातील निवडणुकीत जस्टिन ट्रूडो यांचा लिबरल पक्ष पुन्हा सत्तेवर येत आहेत. या निवडणुकीत त्यांचा पक्ष १६६ जागांवर विजय मिळवत असल्याचे दिसून येत आहे. कॅनडात सरकार बनवण्यासाठी १७२ खासदारांची गरज आहे. त्यासाठी केवळ ९ जागा ट्रूडो यांच्या पक्षाला हव्या आहेत. आता ट्रूडो याच्या जागी मार्क कार्नी कॅनडाचे पंतप्रधान बनणार आहे. पक्षाने निवडणुकीपूर्वी ट्रूडो यांच्या जागी कार्नी यांना पंतप्रधान करण्याचा निर्णय घेतला होता. या निवडणुकीत विरोधी पक्ष असलेल्या कंझरव्हेटीव्ह पक्षाला १४५ जागा मिळत आहे. हा पक्ष सत्तेपासून खूप लांब आहे.