'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कॉमेडी शोमधून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली अभिनेत्री शिवाली परबचा (Shivali Parab) मोठा चाहता वर्ग आहे. तिला सर्वजण कल्याणच्या चुलबुली या नावाने ओळखतात. तिने आपल्या कॉमेडीने जगाला हसवले आहे. शिवाली परब एक उत्तम अभिनेत्री देखील आहे. तिने आपल्या अभिनयाचे चाहत्यांना वेड लावले आहे. ती कोणतीही भूमिका खूप सुंदर रित्या पार पाडते. नुकतेच तिने इन्स्टाग्राम आपल्या नवीन लूकचे फोटो शेअर केले आहेत.
शिवालीचा लूकचुलबुलीने शिवाली परबने नुकतेच साडीतील सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्सचा वर्षाव होत आहे. ती या पारंपरिक लूकमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. शिवालीने हिरव्या रंगाची साडी नेसली आहे आणि पांढऱ्या रंगाचा स्टायशिल ब्लाऊज परिधान केला आहे. शिवालीच्या साडीवर पांढऱ्या रंगाच्या फुलांची छान नक्षी पाहायला मिळत आहे. तिने हा लूक सिल्व्हर ज्वेलरी घालून पूर्ण केला आहे. शिवालीने गळ्यात सिल्व्हर रंगाचा नेकपीस आणि मोठे कानातले घातले आहे. तर हातात हिरव्या आणि सिल्व्हर रंगाच्या बांगड्या घातल्या आहेत.
चाहत्यांच्या कमेंट्समोकळ्या केसांमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. तिच्या फोटोंमधील कातिल अदा पाहून चाहते फिदा झाले आहेत. शिवालीने खूपच मिलिमल मेकअप केला आहे. तिने या फोटोंना खूप हटके कॅप्शनं दिले आहे. शिवाली परबने लिहिलं की, "Green flag" कमेंट्समध्ये चाहते शिवालीच्या सौंदर्याचे कौतुक करताना दिसत आहे. एका युजरने लिहिलं की, "महाराष्ट्राची ..." तर दुसऱ्या युजरने लिहिलं की, "अति कोमल व सुंदर शिवा...किप इट अप" तसेच शिवा द ग्रेट, खूप सुंदर दिसत आहेस, मराठमोळी मुलगी अशा कमेंट्स येत आहेत.
शिवाली परब सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. आपल्या विविध लूकचे फोटो आणि व्हिडीओ ती चाहत्यांसोबत शेअर करते. चाहते देखील शिवालीला भरभरून प्रेम करतात. सध्या प्रेक्षक शिवालीच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहत आहेत. तिने आपल्या अभिनय आणि कॉमेडीच्या बळावर यश संपादन केले आहे.