आयपीएल 2025 स्पर्धेत 14 वर्षीय वैभव सूर्यवंशीने अनेक विक्रम आपल्या नावे केला आहे. अवघ्या 14 वर्षात त्याने घेतलेली भरारी पाहून अनेकांना विश्वासच बसत नाही. पदार्पणाच्या सामन्यात पहिल्याच चेंडूवर षटकार मारून त्याने आपली छाप सोडली होती. त्यानंतर तिसऱ्या सामन्यात फक्त 35 चेंडूत 11 षटकारांच्या मदतीने शतक ठोकलं. त्यामुळे त्याच्या नावावर अनेक विक्रमांची नोंद झाली आहे. त्यामुळे गल्लीबोळात त्याच्या नावाची चर्चा होत आहे. त्यामुळे त्याच्यात अशी काय खासियत आहे की त्या अल्पावधीतच यश मिळालं. त्यामुळे अनेक ज्योतिष्यांनी त्याची कुंडली मांडली आणि ग्रहांची स्थिती पाहीली. अंकशास्त्र आणि कुंडलीत ग्रहांचा मेल कसा बसला याबाबत आकलन केलं आहे. चला जाणून घेऊयात ज्योतिषशास्त्रानुसार त्याला कोणत्या ग्रहाची साथ मिळाली ते…
14 वर्षीय क्रिकेटपटू वैभव सूर्यवंशी याचा जन्म बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यातील ताजपूर येथे झाला. वैभव सूर्यवंशीची जन्मतारीख 27 मार्च 2011 आहे. त्याची मीन रास असून नक्षत्र पूर्वाषाढा आहे. पूर्वषाढा नक्षत्रावर जन्म घेतलेल्या वैभवने वयाच्या 12व्या वर्षी क्रिकेट जगतात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. देशांतर्गत क्रिकेटमध्ये केलेल्या कामगिरीमुळे त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली. ज्योतिषशास्त्रानुसार पूर्वाषाढा नक्षत्रावर जन्मलेल्या जातकांना जिंकणारा असं सांगितलं जातं. या नक्षत्रावर जन्म घेतलेल्या व्यक्तींकडे प्रखर क्षमता असते. या व्यक्ती सहजासहजी हार पत्कारत नाही. इतकंच करत वैभवच्या कुंडलीत गुरु ग्रहाचा प्रभाव आहे. मीन राशीचा स्वामी ग्रह गुरुच आहे. त्यामुळे भविष्यात वैभवच्या नावाचा आणखी उदो उदो होईल.
अंकशास्त्रानुसार, वैभव सूर्यवंशीचा मुलांक हा 9 आहे. म्हणजेच 27 तारखेला जन्म झाला म्हणून 2+7= 9 असं होत. 9 या अंकावर मंगळ ग्रहाचा प्रभाव असतो. मंगळ ग्रहामुळे या व्यक्ती धाडसी, पराक्रमी आणि सकारात्मक उर्जेने भरलेल्या असतात. तर वैभवचा भाग्यांक हा 7 आहे. म्हणजेच त्याच्या जन्मतारखेची पूर्ण बेरीज ही 7 येते. या अंकावर केतूचा प्रभाव आहे. त्यामुळे या अंकाच्या प्रभावाखाली असलेले जातक प्रचंड इच्छाशक्तीने भरलेले असतात. त्यामुळे या व्यक्तींना दाबणं किंवा पराभूत करणं कठीण असतं.
(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)