सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' (Zapuk Zupuk) चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा पाहायला मिळत आहे. प्रेक्षक सूरज चव्हाणच्या अभिनयाचे कौतुक करताना पाहायला मिळत आहे. या चित्रपटातील गाण्यांनी तर सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. सूरज चव्हाणला 'बिग बॉस मराठी 5' खूप लोकप्रियता मिळाली आहे. तो या पर्वाचा विजेता झाला. 'झापुक झुपूक'मधून तो मोठ्या पडद्यावर आला. चित्रपट रिलीज होऊन आता चार दिवस पूर्ण झाले आहेत. चित्रपटाचे आतापर्यंतचे कलेक्शन जाणून घेऊयात.
'' चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर यशस्वी घौडदौड सुरू आहे. (Suraj Chavan) 'झापुक झुपूक' चित्रपट 25 एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन केदार शिंदे यांनी केले आहे. 'झापुक झुपूक' रिलीजच्या पहिल्या दिवसापासून बंपर कमाई करत आहे. रोज चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होताना पाहायला मिळत आहे. चित्रपट रिलीज होऊन आता चार दिवस झाले आहेत. चित्रपटाची एकूण कमाई जाणून घेऊयात.
दिवस पहिला - 24 लाख
दिवस दुसरा - 24 लाख
दिवस तिसरा - 19 लाख
दिवस चौथा - 14
एकूण - 81 लाख
सूरज चव्हाणचा 'झापुक झुपूक' चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आज चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक स्पेशल ऑफर प्रेक्षकांसाठी ठेवली आहे.'झापुक झुपूक' चित्रपट मंगळवारी म्हणजेच आज (29 एप्रिल)ला प्रेक्षकांना अवघ्या ₹99 रुपयांमध्ये (99 Rupees Movie Ticket Offer) थिएटरमध्ये पाहता येणार आहे. यामुळे आज चित्रपटगृहात गर्दी पाहायला मिळणार आहे. आज चित्रपट किती कमाई करतो हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सूरजच्या 'झापुक झुपूक' चित्रपटात अनेक तगडे कलाकार पाहायला मिळत आहेत. यात सूरज चव्हाणसोबत जुई भागवत, इंद्रनील कामत, हेमंत फरांदे, मिलिंद गवळी, दीपाली पानसरे असे अनेक मोठे कलाकार झळकले आहेत.