पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे फर्मान सोडले होते. या फोटोत रविवारी भारतातून पाकिस्तानात प्रवेश करण्याच्या प्रतीक्षेत असलेल्या लोकांचे पासपोर्ट तपासले जात आहेत.
काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानी नागरिकांना देशाच्या बाहेर काढले. हल्ल्यात सहभागी असल्याचा भारताचा आरोप फेटाळणाऱ्या पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून बहुतेक भारतीय नागरिकांचे व्हिसा रद्द केले.
तखत सिंग यांना त्यांच्या पत्नीशिवाय पाकिस्तानला पाठवण्यात आलं. त्यांच्या पत्नीचा पासपोर्ट भारतीय आहे. "तुम्ही आम्हाला असे कसे वेगळे करू शकता? असा सवाल त्यांनी केला.
वर्षांनुवर्ष ज्या देशात राहत आलो आहे, तोच देश सोडावा लागतो आहे. अनेकांच्या डोळ्यात यावेळी अश्रू बघायला मिळाले.
दोन्ही देशांतील नागरीक मायदेशी परतत असून सर्वाधिक संख्या पाकिस्तानातून येणाऱ्या भारतीयांची असल्याचे समोर आले आहे.
वजिदा खान यांनी अधिकाऱ्यांना तिच्या मुलांसह पाकिस्तानात परत येण्याची परवानगी मिळावी यासाठी दिवसभर प्रयत्न केले. पण त्याचा काही उपयोग झाला नाही. त्यांचा पासपोर्ट पाकिस्तानी आहे, पण त्यांच्या मुलांचा पासपोर्ट भारतीय आहे.
पाकिस्तानात प्रवेश करण्यासाठी वाट पाहणाऱ्या महिला
सीमेच्या भारतीय बाजूला वाहनांच्या लागलेल्या रांगा