कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर परतली आहे. केकेआरने दिल्ली कॅपिट्ल्सवर त्यांच्याच घरच्या मदैानात अर्थात अरुण जेटली स्टेडियममध्ये 14 धावांनी विजय मिळवला आहे. कोलकाताने दिल्लीला विजयासाठी 205 धावांचं आव्हान दिलं होतं. मात्र दिल्लीला 20 ओव्हरमध्ये 9 विकेट्स गमावून 190 धावांपर्यंतच पोहचता आलं. केकेआरने अशाप्रकारे आयपीएल 2025 मधील एकूण चौथा विजय मिळवला.केकेआरसाठी प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना अटीतटीचा होता. केकेआरने विजयी होत आपलं आव्हान कायम ठेवलं आहे. तर दुसऱ्या बाजूला दिल्लीचा हा या मोसमातील एकूण चौथा तर सलग दुसरा पराभव ठरला.