भुकूम, ता. २९ : ‘‘शेतकऱ्यांनी स्वतःच्या विकासासाठी संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान व विक्री व्यवस्थापन करून अधिक उत्पन्न मिळवावे,’’ असे आवाहन म्हसोबा देवस्थानच्या अध्यक्षा मधुरा भेलके यांनी केले.
आंदगाव (ता. मुळशी) येथील हायस्कूलमध्ये मुळशी तालुका शेतकरी संघाने आयोजित तिसऱ्या कृषी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा म्हणून भेलके बोलत होत्या. संमेलनासाठी विठोबाच्या वाड्यापासून ग्रंथ दिंडी काढण्यात आली. नंदकुमार वाळंज व बापूसाहेब ढमाले उद्घाटक म्हणून उपस्थित होते.
यावेळी तालुक्यातील दहा प्रगतशील महिला शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. संत तुकाराम कारखान्याचे नवनिर्वाचित संचालक धैर्यशील ढमाले, राजेंद्र कुदळे, यशवंत गायकवाड दत्तात्रेय उभे यांचा सन्मान करण्यात आला. प्रगतशील शेतकरी जालिंदर सोळसकर यांनी सांगितले की, भात काढणी झाल्यावर वेगवेगळे भाजी पाला पीक घेण्याचे नियोजन केले पाहिजे. ढोबळी मिरची, टोमॅटो लागवड करून काढणीची वेळ साधणे गरजेचे आहे. शेणखत, जीवामृत यांचा वापर केला पाहिजे.
यावेळी तानाजी वाडीकर म्हणाले, निर्यातक्षम आंबा उत्पादनात मोठा फायदा मिळू शकतो. सघन पध्दत व इस्राईल तंत्रज्ञानाचा वापर केल्यास एकरी एक हजार झाडे बसू शकतात. त्यामुळे एकरी चाळीस लाखाचे उत्पन्न मिळू शकते.
यावेळी जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष सुनील चांदेरे, माजी सभापती बाळासाहेब चांदेरे, शिवसेना जिल्हा प्रमुख प्रकाश भेगडे, संघाचे अध्यक्ष राजेंद्र मारणे, शांताराम इंगवले, महादेव कोंढरे, सचिन खैरे, गंगाराम मातेरे, दगडूकाका करंजावणे, रविकांत धुमाळ चंद्रकांत भिंगारे, सीताराम तोंडे, बाळासाहेब विनोदे, स्वाती ढमाले, गौरी भरतवंश, दीपाली कोकरे, रामचंद्र देवकर, कैलास मारणे, विलास अमराळे, तानाजी मरगळे, सुरेश नागरे तसेच पदाधिकारी तात्यासाहेब देवकर, ॲड. राजेंद्र नागरे, राम गायकवाड, साहेबराव भेगडे, लक्ष्मण निकटे, दत्तात्रेय उभे, तुकाराम मरे, संतोष साठे, महादेव मरगळे, जयराम दिघे, हनुमंत सुर्वे, निवृत्ती येवले, दगडू मारणे, रायबा उभे उपस्थित होते.
भाऊ केदारी यांनी सूत्रसंचालन केले.
02499