सध्या अनेक महिलांना अनियमित मासिक पाळीच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. अनियमित मासिक पाळीचे सर्वात मोठे कारण म्हणजे ताणतणाव. ज्यामुळे अनेकींना मासिक पाळी लवकर येते तर काहींना उशिरा येते. या अनियमित मासिक पाळीच्या समस्येवर मात करायची असेल तर योग्य आहार घेणे अत्यंत गरजेचे असते. कोणत्याही निरोगी महिलेचे मासिक पाळीचे चक्र साधारणपणे 21 ते 35 दिवसांपर्यंतचे असते. मासिक पाळीचा कालावधी प्रत्येक महिलेसाठी हा वेगवेगळा असतो. आणि महिलेचा रक्तस्राव 4 ते 7 दिवसांसाठी असू शकतो. प्रत्येक महिलेच्या शरीर रचनेनुसार, मासिक पाळीदरम्यान होणाऱ्या वेदना, रक्तस्राव या बाबी वेगवेगळ्या असतात.
स्त्रीच्या मासिक पाळीवर अनेक गोष्टी परिणाम करत असतात. याचे सर्वात मुख्य कारण म्हणजे ताणतणाव. त्याव्यतिरिक्त औषधांचे साईड इफेक्ट्स, थायरॉईड , वाढते वय आणि बिघडलेली जीवनशैली हीदेखील कारणे यामागे असू शकतात. मात्र. जर तुम्ही योग्य आहार, नियमित व्यायाम , झोपेचे व्यवस्थित वेळापत्रक आखले तर तुमची मासिक पाळी नियमित राहू शकते. जाणून घेऊयात काही असे पदार्थ ज्यामुळे तुमची मासिक पाळी नियमित राहू शकेल.
खजूर तुमच्या शरीराचे तापमान वाढवण्यास मदत करतात ज्यामुळे तुमचे गर्भाशय आकुंचन पावते आणि यामुळे तुमची मासिक पाळी वेळेवर येण्यास मदत होते.
पपईमध्ये कॅरोटीन आणि पपेन हे पोषक घटक असतात. जे मासिक पाळी दरम्यान रक्तप्रवाह सुधारण्यास मदत करतात.
आले गर्भाशयाला आकुंचन पावण्यास मदत करते ज्यामुळे अनियमित मासिक पाळी नियमित होण्यास मदत होते. तुम्ही आल्याचा चहा तयार करून तो पिऊ शकता किंवा आलेदेखील चघळून खाऊ शकता.
अननसात एक एंजाइम असते जे मासिक पाळी दरम्यान रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करते. तुम्ही याचेही सेवन करू शकता.
ज्या लोकांना मासिक पाळी उशिरा येते त्यांना मेथी खाण्याचा सल्ला दिला जातो. मेथी खरोखरच तुमच्या मासिक पाळीचा कालावधी नियंत्रित करण्यास आणि मासिक पाळीच्या वेदना टाळण्यास मदत करू शकते.
हेही वाचा : वजन कमी करण्याच्या टिप्स: वजन lesasathi सर्वोत्तम स्मार्ट
संपादित – तनवी गुडे