उन्हाळ्यात कोणत्या डाळी खाणे फायदेशीर? तज्ज्ञांकडून जाणून घ्या
GH News April 30, 2025 07:11 PM

उन्हाळा सुरू झाला की हा ऋतू आपल्यासोबत अनेक आरोग्य समस्या घेऊन येतो. या ऋतूत शरीर लवकर थकते. कारण उन्हाळ्यात तीव्र सुर्यप्रकाशामुळे जास्त घाम येण्यासोबतच पचनसंस्था देखील कमकुवत होऊ लागते. अशा वेळेस आहाराकडे विशेष लक्ष देणे खूप महत्वाचे बनते. आयुर्वेदानुसार उन्हाळ्यात थंडावा देणाऱ्या गोष्टी आहारात समाविष्ट कराव्यात.

आयुर्वेद आणि आतड्यांचे आरोग्य तज्ज्ञ डॉ. डिंपल जांगरा सांगतात की, उन्हाळ्यात शरीराला आतून थंडावा देणाऱ्या आणि पचन प्रक्रिया सुरळीत ठेवणाऱ्या जास्तीत जास्त गोष्टी आहारात समाविष्ट करा. या ऋतूत आहारात कोणत्या डाळींचा समावेश करावा हे आपण आजच्या या लेखातुन जाणून घेणार आहोत…

मूग डाळ

मूग डाळ ही सर्वात हलकी आणि पचनासाठी चांगली मानली जाते. त्याचा परिणाम थंडावा देणारा आहे, ज्यामुळे या डाळीच्या सेवनाने शरीराला थंडावा मिळतो आणि पचनसंस्था देखील निरोगी ठेवते. मुग डाळीत प्रथिने, फायबर, पोटॅशियम आणि लोह भरपूर प्रमाणात आढळते. उन्हाळ्यात तुम्ही पातळ मूग डाळ खिचडी किंवा साधी मूग डाळ खाणे खूप फायदेशीर ठरेल.

चणा डाळ

चणाडाळचे स्वरूप संतुलित मानले जाते, परंतु जर ते उन्हाळ्यात सौम्य मसाल्यांनी शिजवले तर त्याचा थंड स्वरूप असल्याचे मानले जाऊ शकते. यामध्ये प्रथिने, फायबर आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असते, जे शरीराला ऊर्जा तर देतेच पण पचनशक्ती देखील वाढवते. उन्हाळ्यात चणा डाळ खाल्ल्याने पोट भरलेले राहते आणि जास्त गरमी जाणवत नाही.

तूर डाळ

उन्हाळ्यात तूर डाळ सर्वात आरोग्यदायी पर्याय मानली जाते. कारण या डाळीचे स्वरून थंड मानले जाते. ही डाळ पचायला सोपी आहे. यामुळे गॅस किंवा अ‍ॅसिडिटीच्या समस्येपासून आराम मिळतो. काही साधे मसाला घालून शिजवलेली तूरडाळ खाल्ल्याने शरीर थंड राहते.

मसूर डाळ

मसूर डाळमध्ये लोह, फॉलिक ॲसिड आणि फायबर मुबलक प्रमाणात असते, जे शरीरातील रक्ताची कमतरता दूर करण्यास मदत करते. उन्हाळ्यात, हलक्या मसाल्यांसह शिजवून ही मसुर डाळ खाल्ल्याने शरीर थंड राहण्यास मदत होते.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.