Mother Dairy Milk Prices Hike : दिल्ली-एनसीआरमध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या मदर डेअरीने खरेदी खर्च वाढल्याचे कारण देत दुधाच्या किमतीत प्रति लिटर २ रुपयांपर्यंत वाढ केली आहे. सुधारीत दर दिल्ली, हरियाना, उत्तर प्रदेश, उत्तराखंड या राज्यांमध्ये लागू होणार आहेत. कंपनीच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले की, सुधारीत किंमत ३० एप्रिल २०२५ पासून संपूर्ण बाजारपेठेत लागू होईल. काही दिवसांपूर्वीच अमूलने दुधाच्या किमती वाढवल्या होत्या. तेव्हापासून इतर डेअरी संस्था देखील दुधाच्या दरात वाढ करण्याची शक्यता होती. दूध महाग का झाले?मदर डेअरीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, खरेदी खर्चात लक्षणीय वाढ झाल्यामुळे किंमत सुधारणा आवश्यक झाली आहे. गेल्या काही महिन्यांत हा खर्च प्रति लिटर ४ ते ५ रुपयांनी वाढला आहे. अधिकाऱ्याने सांगितले की, खरेदीच्या किमतीत वाढ प्रामुख्याने उन्हाळ्याच्या सुरुवातीमुळे तसेच उष्णतेच्या लाटेमुळे झाली. वेगवेगळ्या श्रेणींमध्ये दुधाचे हे नवीन दरदरवाढीनंतर, दिल्ली-एनसीआरमध्ये टोन्ड दुधाची (घाऊक) किंमत प्रति लिटर ५४ रुपयांवरून ५६ रुपये प्रति लिटर झाली आहे. फुल क्रीम दुधाची (पाउच) किंमत प्रति लिटर ६८ रुपयांवरून ६९ रुपये होईल. यामुळे टोन्ड दुधाची (पाउच) किंमत प्रति लिटर ५६ रुपयांवरून ५७ रुपये होईल तर डबल टोन्ड दुधाची किंमत प्रति लिटर ४९ रुपयांवरून ५१ रुपये होईल. मदर डेअरीने गायीच्या दुधाची किंमतही ५७ रुपयांवरून ५९ रुपये प्रति लिटर केली आहे.

दररोज ३५ लाख लिटर दूधाची विक्री मदर डेअरी त्यांच्या स्टोअर्स, इतर आउटलेट्स आणि ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मद्वारे दिल्ली-एनसीआर मार्केटमध्ये दररोज सुमारे ३५ लाख लिटर दूध विकते. मदर डेअरीने म्हटले आहे की, आमच्या दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उपजीविकेला आधार देत ग्राहकांना दर्जेदार दूध उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत. अधिकाऱ्याने सांगितले की, ही किंमत सुधारणा वाढीव खर्चाचा केवळ अंशतः परिणाम प्रतिबिंबित करते आणि शेतकरी आणि ग्राहक दोघांच्याही हिताची काळजी घेण्याचा उद्देश आहे.