मुंबई : सरकारी बँक बँक ऑफ बडोदा (BOB) ने ७ एप्रिल २०२५ पासून आपल्या मुदत ठेव (FD) योजनांमध्ये मोठा बदल केला आहे. बँकेने बीओबी स्क्वेअर ड्राइव्ह डिपॉझिट स्कीम (BOB Square Drive Deposit Scheme) नावाची नवीन एफडी योजना सुरू केली आहे. या योजनेत ग्राहक ४४४ दिवसांसाठी एफडी करू शकतात आणि चांगले व्याज मिळवू शकतात. बँक ऑफ बडोदाने त्यांची जुनी उत्सव ठेव योजना बंद केली आहे. आता ही नवीन योजना सर्व ग्राहकांसाठी उपलब्ध आहे.
किती व्याज मिळेल?सामान्य नागरिकांसाठी - ७.१५%ज्येष्ठ नागरिकांसाठी - ७.६५%अति ज्येष्ठ नागरिकांसाठी (८० वर्षांवरील) - ७.७५%तुम्ही १ कोटी रुपयांपेक्षा जास्त आणि ३ कोटी रुपयांपेक्षा कमी रकमेची एफडी केली असेल आणि ती नॉन-कॉलेबल एफडी असेल (म्हणजे तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढू शकत नाही) तर व्याजदर ७.२०% ते ७.८०% पर्यंत असू शकतो.
कॉलेबल आणि नॉन कॉलेबल एफडी म्हणजे काय?
नॉन कॉलेबल एफडी : यामध्ये निर्धारित वेळेपूर्वी पैसे काढता येत नाहीत. ही एफडी मोडली तर तर तुम्हाला दंड भरावा लागेल.
कॉलेबल एफडी : यामध्ये तुम्ही मॅच्युरिटीपूर्वी पैसे काढू शकता. यासाठी कोणताही दंड नाही.
एफडीवरील नवीन व्याजदर (३ कोटी रुपयांपेक्षा कमी)७-१४ दिवस: ४.२५%१५-४५ दिवस: ४.५०%४६-९० दिवस: ५.५०%९१–१८० दिवस: ५.६०%१८१–२१० दिवस: ५.७५%२११–२७० दिवस: ६.२५%२७१ दिवस-१ वर्ष: ६.५०%१ वर्ष: ६.८५% १–४०० दिवस: ७.००% (वरिष्ठ: ७.५०%, अतिवरिष्ठ: ७.६०%)२-३ वर्षे: ७.१५% (वरिष्ठ: ७.६५%, अतिवरिष्ठ: ७.७५%)५-१० वर्षे: ६.५०% (सुपर सीनियर: ७.५०%)कर बचत एफडी (५ वर्षांची मुदत)सामान्य ग्राहक: ६.८०%ज्येष्ठ नागरिक: ७.४०%अति ज्येष्ठ नागरिक: ७.५०%