CSK vs PBKS live: युझवेंद्र चहलची ऐतिहासिक हॅटट्रिक! IPL इतिहासातील असा पराक्रम करणारा तिसरा; RJ Mahvash म्हणाली, वॉरियर
esakal May 01, 2025 08:45 AM

IPL vs Punjab Kings Marahi Cricket News : पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यर याने मोक्याच्या क्षणी हुकूमी एक्का काढला... युझवेंद्र चहलला ( Yuzi chahal) १९वे षटक देण्याचा अय्यरचा डाव यशस्वी ठरला. MS Dhoni ला रोखण्यासाठी चहलला आणले आणि त्याने हॅटट्रिकसह त्याच षटकात चार फलंदाज माघारी पाठवून इतिहास घडवला.

CSK ने प्रथम फलंदाजी करताना १९० धावा उभ्या केल्या. एक वेळ अशी होती की चेन्नई सहज दोनशे-सव्वादोनशे धावा करेल असे वाटत होते. पण, च्या एका षटकाने मॅच फिरवली. युझीने १९व्या षटकात हॅटट्रिकसह चार विकेट्स घेतल्या. चेन्नईने ४ बाद १६४ वरून पुढील ६ विकेट्स २.२ षटकांत २६ धावांवर गमावल्या. युझीने ३-०-३२-४ अशी स्पेल टाकली. अर्शदीप सिंग व मार्को यान्सेन यांनी प्रत्येकी दोन विकेट्स घेतल्या. तर अझमतुल्लाह ओमारजाई व हरप्रीत ब्रार यांना प्रत्येकी १ विकेट मिळाली.

शेख रशीद ( ११) व आयुष म्हात्रे ( ७) अपयशी ठरल्यावर सॅम करन व डेवॉल्ड ब्रेव्हिस यांनी ७८ धावांची भागीदारी करून चेन्नईच्या डावाला आकार दिला. ब्रेव्हिस २६ चेंडूंत ३२ धावा केल्या. करनने ४७ चेंडूंत ९ चौकार व ४ षटकारांसह ८८ धावांची खेळी केली. रवींद्र जडेजा ( १७) व महेंद्रसिंग धोनी ( ११) यांना मोठी खेळी करता आली नाही. चेन्नईचा संपूर्ण संघ १९.२ षटकांत १९० धावांत तंबूत परतला. युझवेंद्र चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध हॅटट्रिक घेणारा पहिला गोलंदाज ठरला. त्याची ही दुसरी हॅटट्रिक ठरली.

आयपीएलमध्ये एकापेक्षा अधिक हॅटट्रिक घेणारे गोलंदाज
  • अमित मिश्रा - ३ ( वि. डेक्कन क्रॉनिकल हैदराबाद, २००८, वि. पंजाब किंग्स, २०११, वि. पुणे वॉरियर्स इंडिया, २०१३)

  • युझवेंद्र चहल - २ ( वि. कोलकाता नाइट रायडर्स, २०२२ व वि. चेन्नई सुपर किंग्स, २०२५)

  • युवराज सिंग - २ ( वि. रॉ़यल चॅलेंजर्स बंगळुरू, २००९ व वि. डेक्कन क्रॉनिकल हैदराबाद, २००९)

आयपीएल इतिहासातील सर्व हॅटट्रिक्स
  • 2008 – लक्ष्मीपती बालाजी vs पंजाब किंग्स

  • 2008 – अमित मिश्रा vs डेक्कन चार्जर्स

  • 2008 – माकाया एनटीनी vs कोलकाता नाइट रायडर्स

  • 2009 – युवराज सिंग vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

  • 2009 – रोहित शर्मा vs मुंबई इंडियन्स

  • 2009 – युवराज सिंग vs डेक्कन चार्जर्स

  • 2010 – प्रवीण कुमार vs राजस्थान रॉयल्स

  • 2011 – अमित मिश्रा vs पंजाब किंग्स

  • 2012 – अजित चंदीला vs पुणे वॉरियर्स इंडिया

  • 2013 – सुनील नरीन vs पंजाब किंग्स

  • 2013 – अमित मिश्रा vs पुणे वॉरियर्स इंडिया

  • 2014 – प्रविण तांबे vs कोलकाता नाइट रायडर्स

  • 2014 – शेन वॉटसन vs सनरायझर्स हैदराबाद

  • 2016 – अक्षर पटेल vs गुजरात लायन्स

  • 2017 – अँड्र्यू टाय vs रायझिंग पुणे सुपरजायंट्स

  • 2017 – सॅम्युअल बद्री vs मुंबई इंडियन्स

  • 2017 – जयदेव उनाडकट vs सनरायझर्स हैदराबाद

  • 2019 – सॅम करन vs दिल्ली कॅपिटल्स

  • 2019 – श्रेयस गोपाल vs रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू

  • 2021 – हर्षल पटेल vs मुंबई इंडियन्स

  • 2022 – युझवेंद्र चहल vs कोलकाता नाइट रायडर्स

  • 2023 – राशिद खान vs कोलकाता नाइट रायडर्स

  • 2025 – युझवेंद्र चहल vs चेन्नई सुपर किंग्स

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.