नुकताच यूपीएससीने परीक्षेच्या निकाल जाहीर केला असून यात अनेकांना यश आले आहेत. या यशाच्या निकालात जालनाचाही समावेश आहे
जालना जिल्ह्यातील भाटेपुरी येथील एका सर्वसामान्य शेतकऱ्याचा पोरानं यूपीएससी परीक्षेत येश मिळवत आयपीएस पदावर भरारी घेतली आहे
भाटेपुरी येथील सर्वसामान्य शेतकऱ्याचा मुलाचे नाव आकाश गोरे असून त्याने देशात देशभरात 500 वी रँक मिळवली आहे
आकाश गोरे भाटेपुरी येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील असून त्याच्या वडीलांची दहा ते बारा एकर वडिलोपार्जित शेतजमीन आहे
आकाश याचं प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण शारदा विद्या मंदिर हायस्कूल गेवराई बीड येथे झालं असून लातूर येथील शाहू महाविद्यालयात महाविद्यालयीन शिक्षण झालं आहे.
यानंतर त्याने पुढचे एमबीबीएसचे शिक्षण मुंबई येथील के इ एम महाविद्यालयात केलं आहे. डॉक्टर पेशा चांगला असाना त्याला अधिकारी व्हायचं होतं
यासाठी त्यानं यूपीएससी करण्याचं ठरवलं आणि दिल्ली येथे जाऊन काटेकोर अभ्यास केला. पहिल्याच प्रयत्नात तो मुलाखतीपर्यंत पोचला. पण त्यास यश आले नाही
पण दुसऱ्या प्रयत्नात तो 500 वी रँक मिळवून यूपीएससी पास झाला आहे. तो जालना जिल्ह्यातील पहिला IPS झाल्याने आता त्याचे कौतुक होत आहे.