Kedarnath Dham : भाविकांसाठी आनंदाची बातमी! केदारनाथ धामचे दरवाजे आज पुन्हा उघडणार; समुद्रसपाटीपासून 11,000 फूट उंचीवर आहे मंदिर
esakal May 02, 2025 12:45 PM

केदारनाथ (पीटीआय) : केदारनाथ धामचे (Kedarnath Dham) दरवाजे आज (ता. २) सकाळी भक्तांसाठी पुन्हा उघडण्यात येणार आहेत आणि या प्रसंगासाठी देश-विदेशातून आणलेल्या १०८ क्विंटल विविध फुलांनी हे हिमालयातील मंदिर (Temple in Himalayas) सजवण्यात आले आहे. यासाठी १५० हून अधिक स्वयंसेवकांनी मंदिर सजवण्यासाठी दिवसरात्र काम केले. समुद्रसपाटीपासून ११,००० फूट उंचीवर हे मंदिर आहे. शतकानुशतके मंदिराचे प्रमुख शिवाची सेवा करतात.

नेपाळ, , श्रीलंका आणि दिल्ली, काश्मीर, पुणे, कोलकाता आणि पाटणा या ठिकाणांहून आणलेल्या गुलाब आणि झेंडूसह ५४ प्रकारच्या फुलांचा वापर मंदिर सजवण्यासाठी करण्यात आला आहे, असे गुजरातमधील वडोदरा येथील स्वयंसेवकांचे नेतृत्व करणारे श्रीजल व्यास यांनी सांगितले.

झेंडूची फुले कोलकात्याच्या काही गावांतून आणली जातात. कारण ती लवकर कोमेजत नाहीत आणि सरासरी १०-१५ दिवस टिकतात. घोडे नसल्यामुळे मंदिर सजवण्यासाठी आम्हाला सुमारे ८० क्विंटल फुले आणावी लागली. परंतु देवाची सेवा करण्याची संधी मिळाल्याने आनंद झाल्याचे ते म्हणाले.

गंगा आरतीच्या धर्तीवर आरती करणार

केदारनाथमधील यात्रेकरूंसाठी यावेळी एक नवीन वैशिष्ट्य म्हणजे वाराणसी, हरिद्वार आणि ऋषिकेश येथील गंगा आरतीच्या धर्तीवर मंदिराजवळ मंदाकिनी आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर भव्य आरती केली जाईल, असे बीकेटीसीचे सीईओ विजय थापलियाल यांनी सांगितले.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.