Maharashtra Din 2025 special Breakfast: महाराष्ट्रातील प्रत्येक व्यक्तीसाठी स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि मराठी भाषेच्या अभिमानाचा प्रतिक दिवस म्हणजे महाराष्ट्र दिन. १ मे १९६० रोजी महाराष्ट्र दिनाची स्थापना झाली यामुळे दरवर्षी हा दिवस महाराष्ट्र दिन म्हणून साजरा केला जातो. आजचा दिवस केवळ महाराष्ट्राची स्थापना आठवण्यासाठी नाही इतिहास जपण्यासाठी देखील साजरा केला जातो. या दिवशी सर्वांना सुट्टी असते. तसेच या दिवसाला अधिक खास बनवण्यासाठी सकाळी नाश्त्यात पारंपारिक पद्धतीने ज्वारीचे धिरडे बनवू शकता. धिरडे बनवण्यासाठी कोणते साहित्य लागते आणि कृती काय हे जाणून घेऊया.
धिरडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य१ कप ज्वारीचं पीठ
१/४ कप तांदळाचं पीठ
१/४ कप पाणी
१/२ चमचा धनेपूड
१/२ चमचा जिरं
बारीक चिरलेली ढोबळी मिरची
बारीक चिरलेला टोमॅटो
चिरलेली हिरवी मिरची
१/४ चमचा हळद
किसलेलं गाजर
चवीनुसार मीठ
१/२ लिंबाचा रस
तेल
धिरडे बनवण्याची सोपी पद्धतमहाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी नाश्त्यात ज्वारीचे धिरडे बनवायचे असेल तर सर्वात आधी एका मोठ्या भांड्यात ज्वारीचे पीठ आणि तांदळाचे पीठ घ्यावे. नंतर त्यात मीठ आणि पाणी टाकून पातळ मिश्रण तयार करावे. नंतर त्यात तेलाची फोडणी म्हणजेच तेल गरम करून जीर, मोहरी, कडीपत्त्याची पाने टाका. नंतर यात बारिक चिरलेल्या सर्व भाज्या टाका. नंतर तवा गरम करावा आणि धिरडे करावे. धिरडे दोन्ही बाजून चांगले भाजवे. हिरव्या चटणीसोबत धिरड्याचा आस्वाद घेऊ शकता.