एलपीजी किंमत: देशातील 33 कोटींहून अधिक घरगुती गॅस सिलिंडरधारकांसाठी मोठी बातमी आली आहे. इंडियन ऑइलने एलपीजी गॅसचे दरामध्ये कपात केली आहे. विशेष म्हणजे देशातील व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती 7 महिन्यांनंतर सर्वात स्वस्त होऊन किमती खाली आल्या आहेत. सलग दुसऱ्या महिन्यात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत.
आज (1 मे ) 19 किलोचा व्यावसायिक सिलिंडर स्वस्त झाला आहे. व्यावसायिक सिलिंडरचा दर 17 रुपयांपर्यंत कमी करण्यात आला आहे. आज, कोलकातामध्ये व्यावसायिक सिलिंडर आता 1868.50 रुपयांऐवजी 1851.50 रुपये झाला आहे. मुंबईत या सिलिंडरची किंमत आता 1713.50 रुपयांऐवजी 1699 रुपये झाली आहे. महानगरांमध्ये व्यावसायिक गॅस सिलिंडरची किंमत सर्वात कमी आहे. दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर 1747.50 रुपयांना उपलब्ध होईल. घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये 853 रुपयांना, कोलकातामध्ये 879 रुपयांना, मुंबईत 852.50 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपयांना उपलब्ध असेल.
घरगुती एलपीजी गॅसचे दर 8 एप्रिल रोजी बदलले होते. त्यानंतर सरकारने 14.2 किलोच्या एलपीजी सिलेंडरच्या किमतीत 50 रुपयांची वाढ केली होती. ही वाढ जवळजवळ एक वर्षानंतर झाली. घरगुती एलपीजी सिलिंडर दिल्लीमध्ये 853 रुपयांना, कोलकातामध्ये 879 रुपयांना, मुंबईत 852.50 रुपयांना आणि चेन्नईमध्ये 868.50 रुपयांना उपलब्ध असेल.
देशात एकूण 33 कोटी एलपीजी कनेक्शन आहेत. यापैकी 10.33 कोटी उज्ज्वला योजनेअंतर्गत आहेत, जिथे गरिबांना 300 रुपयांनी कमी किमतीत सिलिंडर मिळतात. दक्षिणेकडील राज्यांमध्ये (जसे की तामिळनाडू, आंध्र प्रदेश) आधीच सरकारी योजना सुरू असल्याने, येथे उज्ज्वला योजनेचे लाभार्थी फक्त 10टक्के आहेत.
अधिक पाहा..