मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील आर्थिकदृष्ट्या गरजू रुग्णांना वैद्यकीय उपचारासाठी तत्काळ मदत मिळावी या उद्देशाने सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमध्ये 'मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष' सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा केली. 1 मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून हे कक्ष पालकमंत्री, मंत्री किंवा राज्यमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. या निर्णयामुळे आर्थिक परिस्थितीमुळे रुग्णावर उपाचार करू न शकणाऱ्या रुग्णांच्या कुटुंबीयांना जिल्हास्तरावरच मदत मिळणार आहे.
महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंच्या शिवसेनेच्या आमदार आणि खासदारांनी हुतात्मा चौक येथील संयुक्त महाराष्ट्रातल्या लढ्यातील हुतात्म्यांना अभिवादन केलं. यावेळी खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि आमदार सुनील प्रभूंसह इतर पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
Pune Sinhagad Road : सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन संपन्नपुण्याती बहुप्रतिक्षित सिंहगड रोडवरील उड्डाणपुलाचे उद्घाटन आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या उपस्थितीत संपन्न झाले. पुलाचे काम पूर्ण होऊन देखील तो नागरिकांसाठी खुला न केल्यामुळे बराच वाद निर्माण झाला होता. त्यानंतर अखेर आज हा पूल सर्वांसाठी सुरू करण्यात आला आहे.
Narendra Modi : PM मोदी आज मुंबईतमुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे आज भारताच्या पहिल्या 'जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन' (वेव्हज्) शिखर परिषदेचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. 'कनेक्टिंग क्रिएटर्स, कनेक्टिंग कंट्रीज'या घोषवाक्याखाली होणाऱ्या 4 दिवसीय शिखर परिषदेत भारताला मीडिया, मनोरंजन आणि डिजिटल नवप्रवर्तनाचे जागतिक केंद्र म्हणून प्रदर्शित करण्यात येणार आहे.