Shehnaaz Gill : शहनाझ गिलनं खरेदी केली लग्जरी कार; किंमत वाचून धक्का बसेल, पाहा PHOTO
Saam TV May 01, 2025 02:45 PM

'बिग बॉस'मुळे खूप लोकप्रियता मिळालेली अभिनेत्री शहनाझ गिल (Shehnaaz Gill) कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चांगली चर्चेत असते. तिने बॉलिवूडमध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. तिच्या अभिनयाचे चाहते दिवाने आहेत. 'बिग बॉस'मध्ये असताना तिचा गेम चाहत्यांना खूप आवडला होता. तिने आपल्या कामाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. आता ही अभिनेत्री पुन्हा चर्चेत आली आहे. तिने सोशल मीडियावर एक पोस्ट करून चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे.

गिलने घरी नवीन पाहुण्याचे स्वागत केले आहे. शहनाझने नुकतीच नवीकोरी लग्जरी खरेदी केली आहे. याचे फोटो शहनाझने सोशल मिडिया शेअर केले आहेत. शहनाझने फोटोंना हटके कॅप्शन दिलं आहे. तिने लिहिलं की, "स्वप्नांपासून ते ड्राईव्हवेपर्यंत...माझ्या मेहनतीला आता चार चाके मिळाली आहेत...खरोखरच धन्य वाटत आहे!" तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कमेंट्सचा आणि कौतुकाचा वर्षाव होत आहे.

शहनाझ गिलची नवीन कार

मीडिया रिपोर्टनुसार, शहनाझ गिलने बेंझ जीएलएस एसयूव्ही ही कार खरेदी केली आहे. ज्याची किंमत जवळपास 1.34 कोटी ते 1.39 कोटी पर्यंत आहे.

शहनाझ गिलने नवीन गाडीसोबत छान फोटोशूट केले आहे. कारच्या शोरुममध्ये शहनाझचे नवीन गाडीसाठी छोटे सेलिब्रेशन देखील करण्यात आले आहे. तसेच फोटोंमध्ये शहनाझ गाडीची पूजा करताना देखील दिसत आहे. चाहते आता शहनाझच्या आगामी प्रोजेक्टची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. शहनाझचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. तिचे इन्स्टाग्राम 18.8 मिलियन फॉलोअर्स आहेत. तिने चित्रपटांसोबत म्युझिक व्हिडीओमध्ये देखील काम केले आहे.

© Copyright @2025 LIDEA. All Rights Reserved.