आयपीएल 2025 स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्स संघाने चाहत्यांची निराशा केली आहे. साखळी फेरीत हवी तशी खेळी करता आली नाही. सुरुवातीला ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात, त्यानंतर महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात संघाची कामगिरी खराब राहिली. आतापर्यंत खेळलेल्या 10 पैकी फक्त दोन सामन्यात विजय मिळवता आहे. आठ सामन्यात पराभवाचं तोंड पाहील्याने स्पर्धेतून आऊट होणारा पहिला संघ ठरला आहे. चेन्नई सुपर किंग्सची प्लेऑफमध्ये न पोहोचण्याची ही चौथी वेळ आहे. यापूर्वी, चेन्नई सुपर किंग्ज संघ 2020, 2022 आणि 2024 मध्ये लीग टप्प्यात बाहेर पडला होता. परंतु सलग दोन पर्वात प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यात अपयश येण्याची ही पहिलीच वेळ आहे. महेंद्रसिंग धोनी आणि चेन्नई सुपर किंग्सचे सीईओ कासी विश्वनाथन हे संघ स्पर्धेतून आऊट झाल्यानंतर दीर्घ चर्चा करताना दिसले. पाच वेळा विजेता असलेल्यासंघाला सलग दोन पर्वात पहिल्या फेरीतच बाहेर पडून निराश होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
चेन्नई सुपर किंग्स संघ या स्पर्धेतून बाद झाला असला तरी चार संघांसाठी अडसर ठरू शकतो. कारण चेन्नई सुपर किंग्स संघ स्पर्धेतील शेवट गोड करण्याचा प्रयत्नात असेल. त्यामुळे चार संघांची धाकधूक वाढली आहे. प्रामुख्याने तीन संघ टॉप चार शर्यतीत आघाडीवर आहे. तर राजस्थान रॉयल्स शर्यतीत असेल की नाही हे मुंबई इंडियन्सविरुद्धच्या सामन्यानंतर कळेल. क्रिकेटमध्ये कधी काय होईल सांगता येत नाही. त्यात एकही संघ अजूनही प्लेऑफसाठी पात्र ठरू शकलेला नाही. त्यामुळे चेन्नई सुपर किंग्स प्लेऑफचं स्वप्न भंग करू शकते. चेन्नई सुपर किंग्सचे पुढचे सामने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्याशी आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचे एकूण 4 सामने शिल्लक आहेत. या चारही सामन्यात विजय मिळवता आला नाही तर गणित जर तर वर येईल. गुजरात टायटन्सचं गणित दोन विजयांवर अवलंबू आहे. गुजरातने 12 आहेत आणि पात्र ठरण्यासाठी 4 पैकी 2 सामने जिंकणं भाग आहे. त्यामुळे चेन्नईविरुद्धचा सामना तितकाच महत्त्वाचा आहे. कोलकाता नाईट रायडर्स संघही प्लेऑफच्या शर्यतीत काठावर आहे. उर्वरित चार पैकी चार सामने जिंकावे लागणार आहेत. त्यामुळे चेन्नई विरुद्धचा सामना महत्त्वाचा आहे. राजस्थान रॉयल्सची स्थिती नाजूक आहे. मुंबई इंडियन्सविरुद्धचा सामना गमावला तर आव्हान संपुष्टात येईल. पण जिंकला तर चेन्नईविरुद्धची लढतीला महत्त्व येईल.