Which zodiac signs will benefit from Ketu transit: 18 मेपासून आकाशात एक महत्त्वाचा बदल घडणार आहे तो म्हणजे केतू ग्रह सिंह राशीत प्रवेश करणार आहे. ग्रहांची ही हलचाल काही राशींसाठी खूपच शुभ ठरणार आहे. या गोचरामुळे नव्या संधी, आर्थिक फायदा, करिअरमध्ये प्रगती आणि नात्यांमध्ये सुधारणा दिसून येईल. चला तर मग जाणून घेऊया कोणत्या राशींचे नशीब उजळणार आहे ते.
वृषभकेतूचा सिंह राशीत होणारा गोचर वृषभ राशीसाठी लाभदायक ठरणार आहे. या काळात केतू वृषभच्या चौथ्या स्थानी प्रवेश करणार असून, घर, जमीन, वाहन इत्यादी मालमत्तेच्या खरेदीचे योग निर्माण होतील. पूर्वी रखडलेली कामे यशस्वीपणे पूर्ण होतील. सासरकडील नातेसंबंध सुधारतील. आरोग्याच्या बाबतीतही काहीसा दिलासा मिळेल. गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळण्याची शक्यता आहे.
सिंहकेतूचा सिंह राशीत गोचर होत असल्यामुळे सिंह राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच चांगला ठरेल. केतू लग्न भावात आल्यामुळे तुमच्या स्वभावात सकारात्मक बदल दिसून येतील. कामाच्या ठिकाणी यश मिळेल आणि समाजात तुमची ओळख वाढेल. प्रेमसंबंध अधिक सकारात्मक होतील. पैशांची कमाई करण्याचे नवे मार्ग मिळतील. वैवाहिक आयुष्यातही समाधान आणि आनंद अनुभवायला मिळेल.
धनुधनु राशीसाठी हा गोचर भाग्यवान ठरेल. केतू या राशीच्या नवव्या स्थानी येणार असून त्यामुळे नशिबाची साथ मिळेल. कारकिर्दीत प्रगतीची शक्यता असून, वरिष्ठ पद मिळण्याची किंवा महत्त्वाचे प्रोजेक्ट हातात येण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टी आणि आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होईल. अनपेक्षितपणे किंवा अचानक करिअरमध्ये झपाट्याने वाढ होऊ शकते. कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण होईल.
डिस्क्लेमर : सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. सकाळ माध्यम समूह अशा कोणत्याही गोष्टींची पुष्टी करत नाही. अधिक तपशीलांसाठी तुम्ही तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊ शकता.